Property Sale: एप्रिल-जून तिमाहीत घरांची विक्री 4.5 पट वाढली, मुंबई-पुण्यात इतक्या घरांची झाली विक्री
Property Sale: या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत आठ शहरांमधील घरांची विक्री वार्षिक तुलनेत 4.5 पटीने वाढून 74,330 युनिट्सवर पोहोचली.
Property Sale: या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत आठ शहरांमधील घरांची विक्री वार्षिक तुलनेत 4.5 पटीने वाढून 74,330 युनिट्सवर पोहोचली. तर जानेवारी-मार्चच्या मागील तिमाहीच्या तुलनेत घरांची मागणी पाच टक्क्यांनी जास्त होती. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत 15,968 घरांची विक्री झाली होती आणि 2022 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत हा आकडा 70,623 युनिट्स इतका होता.
PropTiger.com चा अहवाल
ऑस्ट्रेलियाच्या REA समूहाच्या मालकीच्या PropTiger.com ने आपल्या ताज्या 'रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल' अहवालात म्हटले आहे की, एप्रिल-जून 2022 मध्ये वार्षिक वाढ अनेक पटींनी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे घरांच्या मागणीवर परिणाम झाला होता. प्रॉपर्टी कन्सल्टंट प्रॉपटायगरच्या माहितीवरून ही माहिती मिळाली आहे.
मुंबई
एप्रिल-जून 2022 दरम्यान मुंबईतील घरांची विक्री अनेक पटींनी वाढून 26,150 युनिट्स झाली. जी मागील वर्षी याच कालावधीत केवळ 3,380 युनिट होते. मागील तिमाहीत विक्री झालेल्या 23,360 युनिट्सच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्क्यांनी जास्त आहे.
पुण्यात एप्रिल-जून 2022 मध्ये 13,720 युनिट्सची विक्री झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 2,500 युनिट्सची होती. जानेवारी-मार्च 2022 मध्ये विक्री झालेल्या 16,310 युनिट्सच्या तुलनेत हे प्रमाण 16 टक्क्यांनी जास्त आहे.
दिल्ली-एनसीआर
दिल्ली-एनसीआर बाजारात या वर्षी एप्रिल-जून दरम्यान विक्री 60 टक्क्यांनी वाढून 4,520 युनिट्सवर गेली आहे. जी मागील वर्षीच्या 2,830 युनिट्सच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढली आहे. मागील तिमाहीत विक्री 5,010 युनिट्स होती. एप्रिल-जून 2022 मध्ये निवासी मालमत्तेची विक्री 7,910 युनिट्सपर्यंत वाढली आहे, जी मागील वर्षीच्या 2,430 युनिट्सवरून वाढली आहे. जानेवारी-मार्च 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 6,560 युनिट्सपेक्षा हे प्रमाण 21 टक्क्यांनी जास्त आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: