RBI ने या सरकारी बँकेला ठोठावला दंड, या बँकेत तुमचे खाते तर नाही!
RBI Imposes Fine : भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे.
RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील Indian Overseas Bank वर ही दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयने बँकेला 57.5 लाखांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने म्हटले की, काही मापदंड आणि फसवणुकीच्या संबंधित असलेल्या नियमांचे पालन न करण्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले की, मार्च 2020 च्या अखेर आपल्या आर्थिक स्थितीतीबाबतीत बँकेचे परीक्षण आणि अहवालाच्या चौकशींच्या आधारे दंड ठोठावला आहे.
आरबीआयने म्हटले की, Indian Overseas Bank ने निर्धारीत केलेल्या तीन आठवड्यांच्यात एटीएम कार्ड क्लोनिंग, स्किमिंगशी निगडीत असलेल्या प्रकरणांची माहिती देण्यास अपयशी ठरले.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
आरबीआयने केलेल्या या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी फारशी काळजी करू नये. Indian Overseas Bank ने प्राधिकरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचा परिणाम बँकेच्या सेवेवर होणार नसल्याचेही आरबीआयने म्हटले.
आरबीआयने पंजाब अॅण्ड सिंध बँकेनेदेखील आरबीआयच्या निर्देशांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने या बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फिनटेक स्टार्टअप्सना नवी दिशा दिली आहे. खरेतर, आरबीआयने प्रीपेड पेमेंट साधनांना म्हणजेच नॉन-बँकिंग क्षेत्रातील PPI जारीकर्त्यांना क्रेडिट सुविधेद्वारे त्यांच्या वॉलेट (Wallet) आणि कार्डमध्ये (Card) पैसे न टाकण्यास सांगितले आहे.
वॉलेट आणि प्रीपेड कार्ड ही PPI ची उदाहरणे आहेत. सेंट्रल बँकेने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सवर 'मास्टर' डायरेक्शन्स (PPI-MD) जारी केले आहेत. ज्यामुळे पीपाआय (PPI) ला रोख, बँक खाती, (Bank Account) क्रेडिट आणि डेबिट कार्ड (Debit Card), PPI आणि इतर पेमेंट साधनांद्वारे 'लोड' आणि 'रीलोड' करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही रक्कम फक्त भारतीय चलनात असावी.
इतर महत्त्वाच्या बातम्या: