एक्स्प्लोर

मोठी बातमी! 'या' एका कंपनीसाठी गुगल मोजणार अब्जो डॉलर्स, लवकरच होणार सर्वांत मोठा करार

गुगलच्या अल्फाबेट या पालक कंपनीकडून एका कंपनीसोबत अब्जो डॉलर्सचा एक करार केला जात आहे. सध्या या कराराची जगभरात चर्चा होत आहे.

मुंबई : एखाद्या प्रश्नाचे उत्तर असो वा कोणती अडचण असो, आपण त्याचे उत्तर थेट गुगलवर शोधतो. सर्व माहिती पुरवणारे एकमेव स्थान म्हणजे गुगल असं सर्रास म्हटलं जातं. याच गुगलची अल्फाबेट ही पालक कंपनी आतापर्यंतचा सर्वांत मोठा करार करत आहे. या कराराच्या माध्यमातून अल्फाबेट सायबर सुरक्षा क्षेत्रातील वीज (Vij) या स्टार्टअप कंपनीला खरेदी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा खरेदी करार तब्बल 23 अब्ज डॉलर्सला होणार आहे. हा करार पूर्ण झाल्यास गुगलने आतापर्यंत केलेला हा सर्वांत मोठा खरेदी करार असेल. 

लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता 

रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने या कराराबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार अल्फाबेटकडून 23 अब्ज डॉलर्समध्ये विज ही कंपनी करेदी केली जात आहे. त्यासाठीचा हा करार अंतिम टप्प्यात आहे. हा खरेदी करार पूर्ण झाल्यावर त्याविषयीची अधिकृत घोषणा होऊ शकते. 

विज कंपनी नेमकं काय करते?

विज ही एक सायबर सुरक्षा क्षेत्रातील एक स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात इस्रायलमध्ये झाली होती.  या कंपनीचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. ही कंपनी क्लाऊड बेस्ड सायबर सुरक्षा प्रदान करते. गेल्या काही वर्षांत या कंपनीने चांगली प्रगती केली असून मॉर्गन स्टेनली, डॉक्यूसाईन आदी दिग्गज कंपन्या वीज या कंपनीच्या ग्राहक आहेत. माइक्रोसॉफ्ट आणि अॅमोझॉन अशा दिग्गज क्लाऊड सेवा प्रोव्हायर कंपन्यासोबतही या कंपनीची भागिदारी आहे. 

विज कंपनीचा अनेक देशांत व्यापार 

विज ही कंपनी जगभरात अनेक देशांत पसरलेली आहे. अमेरिका, युरोप, आशिया, इस्रायलमध्ये या कंपनीचे 900 कर्मचारी आहेत. या वर्षी ही कंपनी आणखी 400 कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्याच्या विचारात आहे. सायबर धोक्यांना ओळखण्यासाठी या कंपनीकडून आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. 2023 मध्ये या कंपनीचे

याआधी दशकभरापूर्वी झालेला अशा प्रकारचा करार

विज या कंपनीला खरेदी करून गुगल नवा इतिहास रचण्याच्या तयारी आहे. कारण गुगलचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा करार आहे. गेल्या दशकभरापासून अशा प्रकारचा मोठा करार गुगलने केलेला नाही.  याआधी गुगलने मोठा करार करू मोटोरोलो मोबिलिटीला खरेदी केले होते. हा करार 2012 साली झाला होता. या कराराअंतर्गत गुगलने 12.5 अब्ज डॉलर्स खर्च केले होते. या करारात गुगलला दुर्दैवाने तोटा झाला. नंतर मोटोरोला मोबिलिटी ही कंपनी गुगलने अवघ्या 2.91 अब्ज डॉलर्सना विकली होती.

हेही वाचा :

गुंतवणुकीतही सचिन तेंडुलकरचा सिक्सर! 'या' कंपनीत लावलेले पैसे झाले चार पट; मिळाले कोट्यवधी रिटर्न्स

श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्यूला, जाणून घ्या काय आहे 15-15-15 सूत्र?

Free Tablet Scheme : केंद्र सरकारकडून खरंच मोफत टॅब्लेट दिले जात आहेत? जाणून घ्या सत्य काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget