सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, दोन दिवसात दरात मोठी घसरण, जाणून घ्या दराबद्दल माहिती
सोन्या चांदीची ((Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Gold Silver Rate: सोन्या चांदीची ((Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र, आता सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात सोन्या चांदीचे दरात नेमकी किती घसरण झाली आहे.
गेल्या काही दिवसात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. चांदीचे दर 93000 किलोवर गेले होते. मात्र, मागील दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल 3000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. सध्या चांदी 90000 रुपयांवर गेली आहे. तर सोन्याच्या दरातही दोन दिवसात 900 रुपयांची घसरण दिसून आली आहे. सध्या सोन्याची किंमत ही प्रतितोळा 73600 रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, COMEX वर सोने 1.22 टक्क्यांनी घसरले आहे. तर चांदीच्या दरात 1.57 टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान, सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळं सोनं खरेदीकडं लोकांनी पाठ फिरवली होती. आता मात्र, दरात घसरण झाल्यामुळं नागरिकांना सोनं चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
महत्वाच्या बातम्या: