दसऱ्याला सोनं महागलं, दिवाळीपर्यंत 80 हजारावर जाणार, आजचा तोळ्याचा दर किती?
Gold and Silver Rate Today : जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा सोनं महागलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत. याच घडामोडींचा परिणाम भारतातील शेअर बाजार तसेच सराफा बाजारवर होत आहे. सध्या सराफा बाजारात सोने आमि चांदीचा भाव कमी-जास्त होणाना दिसतोय. दरम्यान, आज (12 ऑक्टोबर) राज्यभरात दसऱ्यानिमित्त सोनं लुटलं जात असताना पिवळं सोनं मात्र चांगलंच महागलं आहे. आगामी काळात दिवाळीपर्यंत सोन्याचा दर थेट 80 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोन्याचा भाव किती वाढला?
दसऱ्याच्या दिवशीच मुंबईत सोन्याचा दर 77 हजार 800 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. दिवाळीपर्यंत हा दर 80 हजार प्रति तोळ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मध्य पूर्वेकडील भू-राजकीय स्थितीमुळे काही दिवसांआधी सोन्याचे दर वधारल्याचे चित्र होते. मात्र, यात पुन्हा घट झाली होती. भारतात सणासुदीचा काळ असल्याने सोन्याला मोठी मागणी वाढली आहे. अशात सोन्याचे भाव पुन्हा वधारल्याचे चित्र आहे.
चांदीच्या दरातही झाली वाढ
सोन्यासोबतच चांदीच्या दरातह वाढ झाली आहे. चांदीचे भाव सुद्धा वाढले मागील 3 दिवसापासून वाढत आहेत. आज चांदी एक हजार रूपयांनी वाढली आहे. चांदीचा आजचा भाव 97 हजार रूपये प्रति किलो आहे.
हेही वाचा :
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! आता डिजीलॉकरमध्ये Umang App, एकाच ठिकाणी मिळणार अनेक सेवा