रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांचीच निवड का? 'हे' आहेत त्यांचं सामर्थ्य दाखवणारे पाच पुरावे!
Noel Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नोएल टाटा यांनी याआधी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत.
मुंबई : रतन टाटा यांच्या निधनानंतर (Ratan Tata Death) त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel Tata) यांची टाटा ट्रस्टचे (Tata Trust) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते रतन टाटा यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत. टाटा ट्रस्टच्या आजच्या (11 ऑक्टोबर) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, टाटा ट्रस्टचं अध्यक्षपद हे मोठं आहे, तवढीच त्या पदाची मोठी जबाबदारी आहे. टाटा हे नाव एक ब्रँड आहे आणि हाच ब्रँड आणखी मोठा करण्यासाठी नोएल टाटा प्रयत्नशील असतील. दरम्यान, नोएल टाटा हे अनेक अर्थांनी या पदासाठी पात्र आणि सामर्थ्यशाली चेहरा आहेत. त्यांनी टाटा समूहात आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्त्वात टाटा हे नाव आणखी मोठं होण्यास मदत झालेली आहे.
...तेव्हा नोएल टाटा आले होते चर्चेत
नोएल टाटा हे सध्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष झाले आहेत. मात्र याआधी ते अनेकदा चर्चेत आलेले आहेत. टाटा सन्स या कंपनीच्या प्रमुखाची निवड करताना नोएल टाटा असेच चर्चेत आले होते. टाटा सान्सच्या प्रमुखपदासाठी ते नोएल टाटा हे आघाडीच्या नावांमध्ये होते. मात्र त्यावेळी टाटा सन्स या कंपनीच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांची निवड करण्यात आली होती. नोएल टाटा यांनी याआधी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत.
नोएल टाटा यांच्या सामर्थ्याचे 5 दाखले
1) नोएल टाटा हे सध्या टाटा इंटरनॅशनल निमिटेडचे (Tata International) अध्यक्ष आहेत. गेल्या चार दशकांत त्यांनी अनेक जागतिक कंपन्याचा टाटा उद्योग समूहात समावेश करण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
2) नोएल टाटा हे ट्रेंट (Trent), वोल्टास (Voltas) आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Tata Investment Corporation) या कंपन्यांचेही अध्यक्ष आहेत. यासह ते टाटा स्टील (Tata Steel) आणि टायटन कंपनीचे (Titan) उपाध्यक्ष आहेत.
3) या व्यतिरिक्त नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.
4) नोएल टाटा यांच्या नेतृत्त्वात ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2021 टाटा इंटरनॅशनल या कंपनीचा मोठा विस्तार झालेला आहे. या कंपनीचे मूल्य 50 कोटी डॉलर्सवरून 3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढलेलं आहे. .
5) नोएल टाटा यांच्याच नेतृत्त्वात ट्रेंट या कंपनीचा मोठा विस्तार झालेला आहे. 1998 साली ट्रेंट या कंपनीचे फक्त एक स्टोअर होते. आता याच कंपनीचे वेगवेगळ्या ठिकाणी साधारण 700 स्टोअर्स आहेत.
टाटा हे नाव निगडित असलेल्या या उद्योगांची भरभराट नोएल यांच्याच नेतृत्त्वाखाली झालेली आहे. त्यामुळे भविष्यात टाटा ट्रस्टतर्फे आणखी महत्त्वाची कामे होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :