(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Rate Today : सोन्याच्या दरात उसळी! सोन्याबरोबरच चांदीही महागली; वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 54,830 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच जागतिक बाजारातील डॉलर्सचे वाढलेले दर यांसारख्या अनेक कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) वाढतायत. भारतातही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ होतेय. त्यामुळे ग्राहकांना सोनं करेदीसाठी मुरड घालावी लागतेय. भारतात गेल्या एक महिन्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होतेय. त्यामुळे हा दरवाढीचा परिणाम मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह, दिल्लीतही दिसून येतोय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 54,830 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 69,670 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,830
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,261
1 किलो चांदीचा दर - 69,670
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,850
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,279
1 किलो चांदीचा दर - 69,760
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,850
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,279
1 किलो चांदीचा दर - 69,760
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,830
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,261
1 किलो चांदीचा दर - 69,720
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,730
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,169
1 किलो चांदीचा दर - 69,600
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,760
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,197
1 किलो चांदीचा दर - 69,620
सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, पण...