(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
Gold Rate Today : बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 52,010 रूपयांवर व्यवहार करत आहे.
Gold Rate Today : जागतिक बाजारपेठेतील सोने-चांदी तसेच मौल्यवान धातूंचे दर हे सतत बदलत असतात. सध्या सगळीकडे लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यानिमित्ताने ग्राहकांची सोने खरेदी सुरु आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्या-चांदीचे दर किंचित घसरताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 52,010 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
22 कॅरेट सोन्या-चांदीचे आजचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 47,676 | 62,980 |
पुणे | 47,676 | 62,980 |
नाशिक | 47,676 | 62,980 |
नागपूर | 47,676 | 62,980 |
दिल्ली | 47,612 | 62,900 |
कोलकाता | 47,593 | 62,870 |
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :