एक्स्प्लोर

Gold Rate Today: सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी 1 लाख 6 हजारांच्या पार, MCX वर काय घडलं? 

Gold Price Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 99 हजारांच्यावर आहेत. ऑगस्टच्या वायद्याच्या सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचं दिसून आलं. 

Gold Price Today  मुंबई: इराण आणि इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात काय बदल होतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या आठवड्याच्या सुरुवातीला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सुरुवातीला सोन्याच्या दरात फार तेजी नव्हती मात्र नंतर सोने दरानं वेग पकडला. सोन्याचे दर 99200 रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर, चांदीचे दर 1 लाख 6 हजार 600 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायद्यांच्या दरात नरमाई पाहायला मिळाली. तर, चादींच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या ऑगस्टच्या वायद्याच्या दरात 9 रुपयांची घसरण होऊन ते 99100 रुपयांवर सुरु झाले. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली. नव्या अपडेटनुसार 10 ग्रॅम सोन्याचे दर 99185 ते 99200 रुपयांपर्यंत पोहोचले होते. आज सोन्याच्या दरानं 99243 चा उच्चांक गाठला होता तर निचांक 99096 रुपयांपर्यंत पोहोचला होता. यंदाचा सोन्याच्या वायद्याचा उच्चांक 1 लाख 1 हजार 78 रुपये इतका होता.

चांदीच्या दरात वाढ 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात सुरुवातीपासून तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जुलैच्या वायद्याच्या दरात 271 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दराचे वायदे 106495 रुपयांवर सुरु झाले. त्यानंतर यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.  चांदीच्या वायद्यांमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली अन् ते 406 रुपयांच्या वाढीसह 106630 रुपयांपर्यंत वायदे पोहोचले. यंदा चांदीच्या वायद्याच्या दरांचा उच्चांक 109748 इतका आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दर घसरले, चांदीचे दर वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायद्याच्या दरात फार वाढ झाल्याचं दिसून आलं नाही. कॉमेक्सवर सोन्याचे व्यवहार 3400.70 डॉलर प्रति औंसवर सुरु झाले. यापूर्वीचं क्लोजिंग 3385.70 डॉलर प्रति औंस इतकं होतं. सुरुवातीच्या तेजीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचे दर घसरुन 3378.80 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचले होते. यंदा कॉमेक्सवरील सोन्याच्या दराचा उच्चांक 3509.90 डॉलर प्रति औंस इतका आहे. कॉमेक्सवर चांदीचा दर 36 डॉलरच्या दरावर सुरु झाले. त्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.  

सर्राफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 193  रुपयांनी घसरुन 98884 रुपयांवर होते.चांदीच्या दरात वाढ झाली. जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचे दर 101850 रुपये इतके आहेत. तर, आयबीजेएच्या  दरांनुसार 23 कॅरेट सोन्याचे दर 192 रुपयांनी महागले आहेत. 23 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 98488 रुपये  असून हे जीएसटी आणि इतर शुल्कांशिवाय आहेत. यंदा सोन्याच्या दरात मोठी तेजी आली असून सोन्याचे दर 23144 रुपयांनी महागले आहेत. तर, चांदीचे दर 20783 रुपयांनी महागले आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
Ahilyanagar Leopard: 15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
Ahilyanagar Leopard: 15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
Embed widget