एक्स्प्लोर

Stock Market : 15 मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी स्वाहा, शेअर बाजार का कोसळला? चार प्रमुख कारणं

Share Market Update : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे. 

Share Market Update मुंबई : इराण इस्त्रायल संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. कमजोर आंतरराष्ट्रीय संकेत आणि मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. सेन्सेक्स 900 अकांनी घसरून 81488 अंकांपर्यंत पोहोचला होता. तर, निफ्टी 50 निर्देशांक 24850 अंकांच्या खाली आला होता. बीएसई मिडकॅप, स्मॉल कॅप निर्देशांकात देखील जवळपास 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. 

गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य गेल्या सत्राच्या तुलनेत 448 लाख कोटींनी घटून 445 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं. म्हणजेच शेअर बाजारात सकाळचं सत्र सुरु झाल्यानंतर 3 लाख कोटींचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालं.

शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणं :

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. इराण आणि इस्त्रायल संघर्ष दीर्घकाळ चालणार नाही ही गुंतवणूकदारांची अपेक्षा फोल ठरली. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर हल्ले केले. यामुळं मध्य पूर्वेतील संघर्षा वाढला आहे. जियोजित इन्वेस्टमेंटस लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वी.के. विजयकुमार म्हणाले की,जरी इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेनं हल्ले केल्यानं पश्चिम आशियातील संकट वाढलं असलं तरी याचा शेअर मार्केटवरील परिणाम मर्यादित राहील, अशी शक्यता आहे. इराण या हल्ल्यांना कसा प्रतिसाद देतो यावर पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत. इराणनं अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला केल्यास अमेरिकेकडून जोरदार प्रतिक्रिया दिली जाऊ शकते. यामुळं संकट वाढू शकतं. 

हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची धमकी 

इराणच्या संसदेनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. आता, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास खनिज तेलाची वाहतूक करणाऱ्या कार्गो जहाजांचा मार्ग बंद होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार 20 टक्के तेलाचा पुरवठा या मार्गातून होतो. यामुळं क्रूड ऑईल आणि गॅसच्या किमती वाढू शकतात. भारतासारख्या तेल आयातदार देशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

कच्चा तेलाच्या दरांमध्ये वाढ 

जाणकारांच्या मते क्रूड ऑईलच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलरच्या वर राहणं भारतासाठी नुकसान करणारं ठरु शकतं. भारताच्या राजकोषीय धोरणांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. क्रूड ऑईलच्या किमती वाढल्यानं महागाई वाढू शकते.  रुपया कमजोर होऊ शकतो. कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढल्यास त्याचा मिळणारा नफा कमी होण्यावर होईल.

अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर क्रूड ऑईलच्या जागतिक पुरवठ्यावर परिमाण होण्याची शक्यता आहे. यामुळं क्रूड ऑईलचे दर वाढू शकतील. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात 2 टक्के वाढ झाली आहे. क्रूड ऑईल 79 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचलं आहे.तर, दुसरीकडे भारतीय रुपयाची घसरण झाली आहे. 

आर्थिक जाणकारांच्या मते गुंतवणूकदारांनी या अस्थिरतेच्या काळात घाबरुन न जाता विक्री करण्याऐवजी सतर्क राहण्याची गरज आहे.दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. तेलाच्या दरात वाढ झाल्याचं तेल पुरवठादार कंपन्यांच्या स्टॉक्सर परिणाम झाला आहे. आगामी काळात इराण-इस्त्रायल संघर्ष आणि जागतिक तेल बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवावं लागेल. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Electricity Bill : सर्वसामान्यांना 420 व्होल्टचा झटका! फॅन-लाईट तर सोडाच, घर कायमचं बंद असलं तरी भरावं लागणार वीज बिल, 'हा' प्रस्ताव लागू झाला तर खिशाला भुर्डंद
सर्वसामान्यांना 420 व्होल्टचा झटका! फॅन-लाईट तर सोडाच, घर कायमचं बंद असलं तरी भरावं लागणार वीज बिल, 'हा' प्रस्ताव लागू झाला तर खिशाला भुर्डंद
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget