Gold Rate Update : सोनं खरेदी करावं की विकावं? गेल्या 10 दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण, सप्टेंबरमध्ये दर किती रुपयांपर्यंत पोहोचणार?
Gold Price : सोन्याच्या दरात गेल्या 10 दिवसांपासून घसरण सुरु आहे. त्यामुळं सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Gold Rate : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील संघर्ष चर्चेतून संपण्याची चिन्हं निर्माण झाल्यानं सोने दरावर त्याचा परिणाम झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोने खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदार, व्यापारी आणि ज्वेलर्स यावर नजर ठेवून आहेत. 8 ऑगस्टला सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. 18 ऑगस्टला 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 92800 इतका होता.
सोन्याच्या दरात घसरण सुरु
सोन्याच्या दरातील घसरणीचं ज्वेलर्सनं स्वागत केलं आहे. त्यांच्या मते दीर्घकाळापासून सोने खरेदीसाठी थांबलेल्या सोने खरेदीदारांना बाजारात पुन्हा खरेदी सुरु करण्याची संधी आहे. बाजार जाणकारांच्या मते सध्याची घसरण जागतिक आर्थिक संकेतांमुळं आणि जिओपॉलिटिकल तणाव कमी झाल्यानं झाली आङे. जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी अँड करंट रिसर्च उपाध्यक्ष प्रणव मेहर यांनी पुढील आठवड्यात सोने दराबाबत मिश्र घडामोडी पाहयला मिळू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेची आर्थिक आकडेवारी आणि पुढील महिन्यात होणाऱ्या फेड रिझर्व्हच्या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे
सोने दर कसे राहणार?
पुढील काळात सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम पाहायला मिळू शकतो. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल च्या मानव मोदी यांच्यानुसार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटण्याचं कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव कमी होत असल्याचं चित्र आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध चर्चेतून थांबवण्याचे प्रयत्न आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातील चर्चेनंतर तणाव कमी झाला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव कमी झाल्यानं देखील सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटली आहे.
सोन्याचे आजचे दर
सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 102120 रुपये एक तोळा इतक्यावर आहे. आज 24 कॅरेट सोन्याचेदर 477 रुपयांनी कमी झाले. तर, चांदीचे दर 885 रुपयांनी घसरले. चांदीचा आजचा दर 113165 रुपये किलो आहे. 23 कॅरेट सोन्याच्या दरात 475 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 22 कॅरेट सोन्याचा दर 437 रुपयांनी घसरुन 90818 रुपयांवर आला. दरम्यान, 2025 मध्ये सोन्याचे दर 23046 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीच्या दरात 27148 रुपयांची वाढ झाली आहे. 2025 मधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोने दरांवर दिसून आला आहे. सोने दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
























