Gold Silver Rate Today : आज सोने आणि चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
काल व्यवहार सुरू झाला तेव्हा सोन्याच्या दरात (Gold Silver Rate Update) घसरण दिसत होती, पण जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसे त्याच्या दरात वाढ दिसू लागली
Gold Silver Rate Update : देशातील सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली दिसत आहे. सोन्याच्या जागतिक दरात वाढ झाल्यानंतर आज भारतीय बाजारात सोन्याचा भाव वरच्या श्रेणीत आहे. MCX वर आज सोन्याचे दर 0.33 रुपयांनी म्हणजेच 0.06 टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव
22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई - 47,950 52,310
दिल्ली - 47,950 52,310
पुणे 48,050 52,350
नाशिक 48,050 52,350
नागपूर 48,020 52,330
सुरत 48,000 52,400
MCX वर सोन्याचे दर काय?
MCX वर आज सोन्याचे दर 0.33 रुपयांनी म्हणजेच 0.06 टक्क्यांनी वाढल्यानंतर 51,800 रुपयांवर आहेत आणि MCX वर 27 रुपयांनी घसरल्यानंतर चांदीचा दर 68,237 रुपये प्रति किलोच्या दरांवर व्यवहार करत आहे.
काल सोन्या-चांदीचे कसे होते?
काल सोन्याचा भाव 0.8 टक्क्यांनी आणि चांदीचा भाव 0.9 टक्क्यांनी बंद झाला. काल व्यवहार सुरू झाला तेव्हा सोन्याच्या दरात घसरण दिसत होती, पण जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसे त्याच्या दरात वाढ दिसू लागली.
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market : शेअर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्स 58200 अंकावर, निफ्टीही वधारला
- फक्त 5 मिनिटात इलेक्ट्रिक स्कूटर होणार चार्ज, Ola ने या कंपनीशी केली हातमिळवणी
- MDH Masala : भारतातील सर्वात प्रसिद्ध MDH मसाल्यांचे शेअर्स घसरले, कंपनीच विकायची आली वेळ
सोन्या-चांदीच्या जागतिक किमती काय?
जागतिक बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या किमतींवर नजर टाकली, तर सोने प्रति औंस $1,941.71 या पातळीवर व्यवहार करत आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर ते प्रति औंस $25.05 च्या पातळीवर आहे. गुंतवणूकदारांची सोन्याबाबतची उत्सुकता वाढत असून, त्यासाठीचा भावही सुधारला आहे,