Share Market : शेअर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्स 58200 अंकावर, निफ्टीही वधारला
Share Market Updates : बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. मंगळवारी बाजार बंद होताना वधारला होता.
Share Market Updates : शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सकारात्मक संकेत दिसून आले. जागतिक पातळीवरील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
आज सकाळी सेन्सेक्स 200 अंकांनी वधारत सुरू झाला. निफ्टीदेखील जवळपास 90 अंकांनी वधारत सुरू झाला. सेन्सेक्स 58,198 अंकांवर सुरू झाला. निफ्टीदेखील 17405 अंकांवर उघडला.
प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 209.34 अंकांनी म्हणजे 0.36 अंकांनी वधारला. तर, निफ्टी 89.50 अंकांच्या तेजीनंतर 17405 अंकांवर व्यवहार करत आहे.
आज वधारणारे शेअर्स
आज डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे शेअर 2.76 टक्क्यांनी वधारला. तर, डिव्हीज लॅबच्या शेअरमध्ये 2.28 टक्क्यांनी वधारला आहे. हिंदाल्कोच्या शेअर दरात 1.88 टक्के आणि एसबीआय लाइफचा शेअर 1.04 टक्क्यांनी वधारला.
घसरणारे शेअर्स
भारती एअरटेलच्या शेअर दरात 1.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ब्रिटानियामध्ये 1.42 टक्क्यांनी, कोल इंडियामध्ये 1.4 टक्के, मारुती सुझुकीत 1.36 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
मंगळवारी बाजार वधारला
सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार सावरल्याचं चित्र आहे. मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 696 अंकांनी तर निफ्टीही 197 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.22 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,989 अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 1.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,315 अंकांवर बंद झाला. Tech Mahindra, BPCL, Tata Motors, Reliance Industries आणि IOC या कंपन्यांच्या निफ्टी शेअर दरात मोठी वाढ असून HUL, Nestle India, Britannia Industries, Cipla आणि Divis Lab या कंपन्यांच्या निफ्टी शेअर दरात घसरण झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- फक्त 5 मिनिटात इलेक्ट्रिक स्कूटर होणार चार्ज, Ola ने या कंपनीशी केली हातमिळवणी
- MDH Masala : भारतातील सर्वात प्रसिद्ध MDH मसाल्यांचे शेअर्स घसरले, कंपनीच विकायची आली वेळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha