एक्स्प्लोर

Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करताय? मग जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी; नाही तर होऊ शकतो तोटा

Fixed Deposit Tips: अनेक लोक त्यांचे पैसे कोणतेही जोखमी न घेता जोखीममुक्त योजनांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. आजही भारतात एक मोठा मध्यमवर्ग आहे, जो बँक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो.

Fixed Deposit Tips: अनेक लोक त्यांचे पैसे कोणतेही जोखमी न घेता जोखीममुक्त योजनांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. आजही भारतात एक मोठा मध्यमवर्ग आहे, जो बँक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. वेगवेगळ्या बँकांमध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD योजना आहेत. गेल्या काही महिन्यांत SBI, Axis Bank, HDFC Bank, Bank of Baroda सह अनेक बँकांनी त्यांच्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही देखील बँकेच्या FD म्हणजेच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे गरज भासल्यास तुम्ही वेळेआधीच FD तोडल्यास तुम्हाला कमीत कमी नुकसान होईल. चला तर जाणून घेऊ काय आहेत या टिप्स.

एफडी Laddering हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही एकूण 5 लाख रुपयांची एफडी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या पाच एफडी कराव्यात. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत एफडी मोडताना तुम्हाला त्रास होणार नाही. यामुळे जर तुम्हाला मुदतीपूर्वी 2 लाख रुपयांची अचानक गरज भासली. तर तुम्ही फक्त दोनच एफडी मोडाल आणि तुम्हाला उर्वरित तीन एफडीवर पूर्ण व्याजाचा लाभ मिळेल. यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे गुंतवताना विविध प्रकारचे अतिरिक्त फायदेही मिळतील.

तुम्ही 10 लाख रुपयांसारख्या मोठ्या रकमेची एकाचवेळी FD केल्यास तुम्हाला 30 टक्के टॅक्स स्लॅबनुसार कर कपात मिळेल. यामुळे तुम्हाला व्याजावर जास्त नफा मिळणार नाही. त्यामुळे कमी रकमेत कमी व्याजदर मिळाले, तरी कमी कर भरावा लागेल आणि आपत्कालीन परिस्थितीत कमी तोटा होईल.

जर तुम्ही बँकेत दीर्घ कालावधीसाठी FD ची योजना करत असाल, तर अशा परिस्थितीत तुम्ही बँकेच्या विशेष योजना जसे की 444 दिवस, 659 दिवस, 888 दिवस इत्यादींमध्ये गुंतवणूक करून अधिक फायदे मिळवू शकता. यामध्ये अनेक वेळा तुम्हाला जास्त व्याज दरासारखे अतिरिक्त फायदे मिळतात.

जर तुम्हाला एफडीवर जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही मोठ्या बँकांऐवजी स्मॉल फायनान्स बँकांमध्ये एफडी करू शकता. मोठ्या बँकांपेक्षा लहान फायनान्स बँका जास्त व्याजदर देतात. यासोबतच ग्राहकांना अतिरिक्त विमा संरक्षणाची सुविधाही मिळते.

संबधित बातमी: 

Fixed Deposit : पोस्ट ऑफीस आणि बँकांमधील सर्वोत्तम व्याजदर कुठे जाणून घ्या; टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वाधिक व्याज

महत्त्वाच्या बातम्या

रिलायन्स इंडस्ट्रीजचा 1977 मधील IPO: धीरूभाई अंबानींच्या एका निर्णयाने सर्वसामान्यांना दिली श्रीमंत होण्याची संधी!
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 1977 मधील IPO: धीरूभाई अंबानींच्या एका निर्णयाने सर्वसामान्यांना दिली श्रीमंत होण्याची संधी!
Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Embed widget