Dream Job: मेटानं काढलं, गुगलनं तारलं; 'या' महिलेचं स्वप्न झालं पूर्ण
एका महिला कर्मचाऱ्याला मेटा (Meta) कंपनीनं कामावरुन काढले होते. मात्र, त्यानंतरच त्या महिलेचं आयुष्य बदलले आहे.
Dream Job: गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणावर हकालपट्टी करण्यात आली आहे. जागतिक क्षेत्रातील मंदीचा मोठा फटका आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना बसला आहे. यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी नवा पर्याय स्वीकारला आहे. अशाच एका महिला कर्मचाऱ्याला मेटा (Meta) कंपनीनं कामावरुन काढले होते. मात्र, त्यानंतरच त्या महिलेचं आयुष्य बदलले आहे. मेटानं काढल्यानंतर या महिलेला गुगलमध्ये (google) नोकरी मिळाली आहे. यानंतर त्या महिलेचं आयुष्य बदलून गेलं आहे.
गेल्या काही वर्षात आयटी कंपन्यांमधून अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यानंतर काही लोकांनी नवीन मार्गही स्वीकारला आहे. तसेच मेटामध्ये पाच महिने काम केल्यानंतर एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले. यानंतर त्याला गुगलमध्ये ड्रीम जॉबची ऑफर मिळाली. होउ झुओनी हर्मियोन (Hou Zhuoni Hermione) असं या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. या महिलेनं सिंगापूरमध्ये Meta कंपनीत प्रोजेक्ट सोर्सिंग मॅनेजर म्हणून काम केले. मात्र, यादरम्यान ती गुगलमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत राहिली होती. महामारीच्या काळात नोकरी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मेटाचे आभार मानले होते. मात्र, त्यानंतर मेटाने कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते.
गुगलमध्ये या पदावर काम करणार
होउ झुओनी हर्मियोनने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. तिला खूप दिवसांपासून गुगलसोबत काम करायचे होते. डब्लिन, आयर्लंड येथे स्थित EMEA साठी प्रादेशिक कमोडिटी मॅनेजर म्हणून Google मध्ये सामील होणे ही त्यांची कारकीर्दीची पुढील पायरी आहे. हे पाहून हर्मिओनी खूप उत्साहित होती. या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, मी डब्लिन, आयर्लंड येथे असलेल्या EMEA साठी एरिया कमोडिटी मॅनेजर म्हणून Google मध्ये सामील झाले आहे. मी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेईन, असे पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मेटाने 21 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले
मेटा कंपनीने हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आणखी येथील शेकडो लोकांचा रोजगार जाणार आहे. ही टाळेबंदी मेटाच्या मोठ्या कर्मचार्यांच्या कपातीचा एक भाग आहे. गेल्या वर्षापासून मेटा कंपनीने जवळपास 21,000 कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांवरुन कमी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Meta: मार्क झुकरबर्गच्या मेटा कंपनीला 10,765 कोटी रुपयांचा दंड, युजर्सच्या व्यक्तिगत सुरक्षेला हानी पोहचवल्याचा आरोप