एक्स्प्लोर

एलन मस्क पुन्हा करणार मोठा धमाका, ही सेवा सुरु करत गुगलला देणार आव्हान

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) हे नेहमीच काहीतरी नवीन गोष्टींमुळं चर्चेत असतात. आता लवकरत एलन मस्क पुन्हा एक नवीन सेवा सुरु करणार आहेत.

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) हे नेहमीच काहीतरी नवीन गोष्टींमुळं चर्चेत असतात. ट्विटर विकत घेतल्यानंचर त्यांनी ChatGPT सारखे त्यांचे उत्पादन xAI सादर केले. आता एलन मस्क ईमेलच्या जगातही पाऊल ठेवणार आहे. लवकरच एलन मस्क Xmail ही सेवा सुरु करणार आहे. त्यामुळं गुगलच्या जीमेलसमोर (Gmail) मोठं आव्हान निर्माण होणार आहे. 

Gmail ला करावा लागणार अडचणींचा सामना

दरम्यान, अलीकडेच जीमेल बंद झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. अशातच आता मस्कच्या Xmail या घोषणेमुळं, जीमेलला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पण, तो Xmail ट्वीटरशी जोडला जाईल, असा विश्वास आहे. ट्वीटरच्या सुरक्षा अभियांत्रिकी संघातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने एलन मस्क यांना Xmail साठी विचारणा केली होती. यावर उत्तर देताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. एलन मस्कची ही घोषणा सोशल मीडियावर आल्यानंतर चर्चेचा विषय ठरली. एका युजरने असे  सांगितले की, माझा जीमेलवरील विश्वास उडाला आहे. दुसऱ्याने लिहिले की मी सध्या हॉटमेल वापरतो. Gmail ही जगातील सर्वात मोठी ईमेल सेवा आहे. 2024 पर्यंत जगभरात त्यांचे 1.8 अब्ज वापरकर्ते असतील. Xmail आल्यास ईमेल सेगमेंटमध्ये युद्ध होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Gmail सुरुच राहणार, गुगलचे स्पष्टीकरण

मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी XAI मध्ये XML तयार होईल, असे मानले जात आहे. दुसरीकडे, जीमेल बंद झाल्याच्या अफवेवर गुगलने ट्वीटरवर सांगितले की आम्ही कुठेही जाणार नाही. आमची सेवा सुरुच राहणार असल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. 

एलन मस्क यांची एकूण संपत्ती 214 अब्ज डॉलर

ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्‍सनुसार, एलन मस्क यांची एकूण संपत्ती 214 अब्ज डॉलर आहे. गेल्या 24 तासांत त्यांनी 8.39 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. असं असलं तरी यावर्षी मात्र त्यांची एकूण संपत्ती घसरली आहे. दुसरीकडे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत यंदा वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत असं म्हणता येईल की, यंदाच्या कमाईच्या बाबतीत एलन मस्क, अंबानी आणि अदानी यांच्या मागे आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क हे टेस्ला व्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांचे मालक आहेत. ते टेस्लामध्ये 20.5 टक्के, स्टारलिंकमध्ये 54 टक्के, SpaceX मध्ये 42 टक्के, X (पूर्वीचे ट्विटर) मध्ये अंदाजे 74 टक्के, बोरिंगमध्ये 90 टक्के, XAI मध्ये 25 टक्के आणि न्यूरालिंकमध्ये 50 टक्के हिस्सेदारी आहे. या कंपन्यांच्या शेअर्समधील वाढ आणि घसरणीनुसार त्यांची नेटवर्थ वाढतं आणि कमी होतं.

महत्वाच्या बातम्या:

एक मिनिटांत कोट्यवधी, एका आठवड्यात अब्जावधी; एलन मस्क कमाईत अंबानी-अदानींनाही टाकतात मागे!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Embed widget