एक्स्प्लोर

बापरे बाप! 3 रुपयांचा शेअर एका दिवसात थेट 2,36,250 रुपयांवर; स्टॉक मार्केटमध्ये रचला नवा इतिहास

शेअर बाजारावर या कंपनीने मोठा इतिहास रचला आहे. कारण या कंपनीच्या शेअरचे मूल्य 3 रुपयांवरून सव्वा दोन लाखांच्याही पुढे गेले आहे.

मुंबई : शेअर बाजारात कधी काय होईल हे सांगता येत नाही. या बाजारात एखादा गुंतवणूकदार एका क्षणात कोट्यधीश होतो तर कधी एखादा गुंतवणूकदार क्षणात उद्ध्वस्त होऊन जातो. सध्या मात्र एका कंपनीने इतिहास रचला आहे. या कंपनीत काही हजार रुपये गुंतवणारे थेट कोट्यधीश झाले आहेत. या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर एका दिवसात तीन रुपयांवर थेट सव्वा दोन लाखांच्याही पुढे गेला आहे. एका दिवास एवढी मोठी भरारी घेऊन या शेअरने भांडवली बाजारात इतिहास रचला आहे.

एलसिड इन्व्हेस्टमेंटने रचला इतिहास

शेअर बाजारात एका दिवसात नवा इतिहास रचणाऱ्या या कंपनीचे नाव एलसिड इन्व्हेस्टमेंट (Elcid Investments) असे आहे. ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 3.53  रुपये होते. हे मूल्य एका दिवसात थेट तब्बल 2,36,250 रुपये झाले. म्हणजेच या शेअरने एका दिवसात तब्बल 66,92,535 टक्क्यांनी भरारी घेतली आहे. या कामगिरीनंतर एलसिड इन्व्हेस्टमेंट ही कंपनी भारतीय भांडवली बाजारात सर्वांत महाग शेअर असणारी कंपनी बनली आहे. याआधी एमआरएफ या कंपनीच्या शेअरचे मूल्य ( 1.2 लाख रुपये) सर्वाधिक होते.

काही कंपन्या पुन्हा एकदा सूचिबद्ध करण्याचा निर्णय

भारतीय शेअर बाजारात एवढी मोठी उलथापालथ याआधी कधीही घडली नाही. 2021 साली क्रिप्टोकरन्सी आली होती. तेव्हा क्रिप्टोकरन्सीमध्ये अशाच प्रकारची उलथापालथ झाली होती. काही दिवसांत क्रिप्टोकरन्सीनचे मूल्य थेट गगनाला भिडले होते. सोमवारी (21 ऑक्टोबर) बीएसई आणि एनएसईने काही कंपन्या पुन्हा एकदा सूचिबद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये काही मोजक्या इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. यात एलसिड एन्व्हेस्टमेंटचाही सहभाग होता. त्याचाच परिणाम म्हणून एलसिड कंपनीच्या शेअरने थेट शिखर गाठले. 

तीन रुपये होता शेअर, सूचिबद्ध होताच...

एलसिड इन्व्हेस्टमेंट या कंपनीचा शेअर जुलै महिन्यात फक्त 3.21  रुपयांवर होता. 29 ऑक्टोबर रोजी ही कंपनी मुंबई शेअर बाजारावर पुन्हा एकदा सूचिबद्ध झाली. ही कंपनी सूचिबद्ध झाली तेव्हा या कंपनीच्या शेअरचे मूल्य (बुक प्राईज) 2,25,000  रुपये होतो. त्यानंतर ड्रेडिंगदरम्यान या शेअरमध्ये आणखी पाच टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे हा शेअर थेट 2,36,250 रुपयांवर पोहोचला. आज (31 ऑक्टोबर) हा शेअर 2 लाख 48 हजार 62.50 रुपयांवर आहे.

हेही वाचा :

गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड! 1 नोव्हेंबरपासून अनेक नियमांत बदल, तुमच्या खिशावर पडणार थेट परिणाम; वाचा...

 NSE Update: एनएसईनं इतिहास रचला, क्लाइंट अकाऊंटसची संख्या 20 कोटींच्या पार, महाराष्ट्र 3.6 कोटी खात्यांसह महाराष्ट्र टॉपवर   

Property Rights: आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा हक्क असतो? काय सांगतो नियम?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget