एक्स्प्लोर

गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड! 1 नोव्हेंबरपासून अनेक नियमांत बदल, तुमच्या खिशावर पडणार थेट परिणाम; वाचा...

येत्या 1 नोव्हेंबरपासून आर्थिक व्यवहाराशी निगडित अनेक नियम बदलणार आहेत. या नव्या नियमांचा तुमच्या थेट खिशावर परिणाम पडू शकतो.

New Rules from 1 November: नोव्हेंबर महिना चालू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. नव्या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या तारखेपासूनच अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहे. या बदललेल्या नियांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ट्रेन तिकिटापासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक नियमांत बदल होणार आहे. 

रेल्वेच्या तिकिटासाठी नवा नियम काय? 

अॅडव्हान्स तिकीट बुकिंगच्या नियमात येत्या 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. याआधी प्रवासी एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर 120 दिवस अगोदरच प्रवासाचं तिकीट अॅडव्हानस बुकिंगच्या माध्यमातून आरक्षित करू शकायचे. आता मात्र हा कालावधी 60 दिवसांवर आणण्यात आला आहे. म्हणजेच येत्या 1 नोव्हेंबरपासून कोणत्याही प्रवासासाठी 60 दिवसाच्यां अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे. 

मनी ट्रान्सफरचा नियम

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डोमॅस्टिक मनी ट्रान्सफरच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे नियम येत्या 1 नोव्हेंबर 2024 रोजीपासून लागू होतील. फसवणुकीपासून ग्राहकांचे रक्षण व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  

LPG सिलिंडरचे दर बदलणार 

प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या दरात बदल करतात. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलंडरचा नवा दर लागू होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या तोंडावर गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

ATF-CNG चा दर 

फक्त गॅस सिलिंडरच नव्हे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ATF-CNG चाही नवा भाव जाहीर केला जातो.

SBI कार्डसाठी नवा नियम 

येत्या 1 नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी नवे नियम लागू होणार आहेत. तुमचे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 50 हजारांपेक्षा कमी युटिलिटी बिल असेल, तर तुम्हाला कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. युटिलिटी बिल मात्र 50 हजारांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला एक टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल.  

म्युच्यूअल फंडासाठी नवा नियम 

नोव्हेंबर महिन्यापासून म्युच्यूअल फंडाच्या इन्ससाईडर ट्रेडिंगच्या नियमांत बदल केला जाणार आहे. 

हेही वाचा :

 NSE Update: एनएसईनं इतिहास रचला, क्लाइंट अकाऊंटसची संख्या 20 कोटींच्या पार, महाराष्ट्र 3.6 कोटी खात्यांसह महाराष्ट्र टॉपवर   

success story : गगनभरारी! 5000 रुपयांचं कर्ज घेऊन सुरु केला व्यवसाय, आज 400 कोटी रुपयांची उलाढाल  

महायुतीला मत दिल्यास लाडक्या बहिणींना 200 किलोनं तेलं खावं लागेल, सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त, खडसेंचा हल्लाबोल 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं

व्हिडीओ

Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा
Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Embed widget