देशातील किरकोळ व्यापार अधिक सुरळीत होणार; राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणाचा आराखडा तयार
केंद्र सरकारच्या 'इज ऑफ डुईंग बिझनेस' धोरणानुसार किरकोळ व्यापाऱ्यांना व्यापारात अधिक सुलभता मिळावी म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्व प्रकारचा किरकोळ व्यापार सुरळीतपणे चालण्यासाठी तसेच किरकोळ व्यापार क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या प्रकारांचा विकास करण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा व्यापार अधिक सुलभ पद्धतीने होण्यासाठी केंद्र सरकारच्या 'इज ऑफ डुईंग बिजनेस'च्या धोरणानुसार काम करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
Draft National Retail Trade Policy has been prepared for streamlining retail trade and development of all formats of retail trade sector in a harmonious manner aiming at improvement in ease of doing business#ParliamentQuestion
— PIB India (@PIB_India) December 22, 2021
Read: https://t.co/V0NGqSb00d pic.twitter.com/Q8IETiI9p2
काय आहे या आराखड्यात?
किरकोळ व्यापार करणाऱ्या छोट्या उद्योग-व्यावसायिकांसाठी उद्योग सुलभ वातावरण निर्मिती, परवडणाऱ्या दरात पत उपलब्धता, किरकोळ व्यापाराचे आधुनिकीकरण आणि डिजिटलीकरणाची सुविधा, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांची व्यसस्था,किरकोळ व्यापाराच्या वितरण साखळीदरम्यान प्रत्यक्ष पायाभूत सुविधा उभारणे, कौशल्य विकासाला प्रोत्साहन आणि उत्पादकता वाढवणे, यातून, मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, त्याशिवाय, किरकोळ व्यापार क्षेत्रातील लोकांसाठी एक सक्षम आणि प्रभावी सल्लाव्यवस्था, आणि तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करणे, कामगार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे इत्यादी बाबींवर या आराखड्यात काम करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :