भारतीयांची दिवाळी जोरात, बाजारात 50 टक्क्यांची उलाढाल; कॉन्फड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा दावा
Diwali 2023 : ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावर जीएसटी कलेक्शन 1 लाख 70 हजार कोटींपेक्षा जास्त होतं. तो दिवाळीच्या बाजारातील तेजीमुळे नोव्हेंबर महिन्यासाठी निश्चित 1 लाख 90 हजार कोटीपर्यंत वाढेल, असा दावा कॉन्फड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी केला आहे.
Diwali 2023 : यंदा दिवाळीत (Diwali 2023) बाजारात फक्त गर्दीच नव्हती, तर मोठ्या प्रमाणावर खरेदीही झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीचा बाजार (Diwali Market) 50 टक्क्यांनी वाढल्याचा दावा कॉन्फड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (Confederation of All India Traders) केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावर जीएसटी कलेक्शन (GST Collection) 1 लाख 70 हजार कोटींपेक्षा जास्त होतं. तो दिवाळीच्या बाजारातील तेजीमुळे नोव्हेंबर महिन्यासाठी निश्चित 1 लाख 90 हजार कोटीपर्यंत वाढेल, असा दावा कॉन्फड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी केला आहे.
अधिकमासामुळे यंदा दिवाळी उशिरा असल्यानं शेतपीक, फळं, फुलं बाजारात येऊन शेतकऱ्यांच्या हाती पैसा होता. त्यामुळे दिवाळीचा बाजार तेजीत होता. शिवाय दिवाळी बारा नोव्हेंबरला असल्यामुळे नोकरदार वर्गात सर्वांचं वेतन आणि बोनस 7 नोव्हेंबरच्या पूर्वी झाल्यामुळे ही लोकांकडे पैसा असल्यानं दिवाळीच्या बाजारात जोरात खरेदी झाल्याचा दावा भरतिया यांनी केला आहे.
यंदाच्या दिवाळीची खासियत म्हणजे, छोट्या व्यापाऱ्यांनी, रस्त्यावर सामान विकणाऱ्यांनी पण चांगली विक्री करून नफा कमवला आहे. 'स्वदेशी बद्दलचा आग्रह' शासनाकडून 'वोकल फॉर लो'सारखी मोहीम आणि 'आत्मनिर्भर भारत' संदर्भात झालेली जागरूकता, यामुळे हे बदल दिवाळीच्या बाजारात जाणवत आहेत. त्यामुळे चीनमधून येणाऱ्या वस्तू भारतीय बाजारातून खास करून सणांच्या बाजारातून कमी झाल्याचा दावा बीसी भरतिया यांनी केला आहे.