(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Daily Hunt : 'डेली हंट'ने गाठला मोठा पल्ला, 805 दशलक्ष डॉलरचा उभारला निधी
Daily Hunt VerSe Innovation : डेली हंट या न्यूज अॅग्रेगेटरची मूळ कंपनी असलेल्या वर्से इनोव्हेशनने मोठी कामगिरी केली आहे, या कंपनीने 805 दशलक्ष डॉलरचा निधी जमवला आहे.
Daily Hunt VerSe Innovation : डेली हंट या News Aggregator कंपनीची मूळ कंपनी असलेल्या VerSe Innovation मोठा पल्ला गाठला आहे. डेलीहंट आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप जोशने 805 दशलक्ष डॉलरचा निधी जमवला असल्याची माहिती कंपनीने आज बुधवारी 6 एप्रिल रोजी दिली. मागील काही महिन्यात बाजारपेठेवर मोठा दबाब असतानाही गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्याने हा पल्ला गाठता आला असल्याची भावना कंपनीने व्यक्त केली आहे.
VerSe Innovationला हा निधी मार्की ग्लोबल इन्व्हेस्टर, कॅनडा पेन्शन प्लान इन्वेस्टमेंट बोर्ड (सीपीपी इन्व्हेस्टमेंट), ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लान बोर्ड (ओंटारियो), लक्सर कॅपिटल, सुमेरू व्हेंचर्स आणि अन्य संस्थांकडून गुंतवणूक करण्यात आली आहे.
उभारण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून AI/ML (artificial intelligence/machine learning) च्या क्षमतांना अधिक बळकट करण्यात येणार आहे. त्याशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंग, वेब 3.0 च्या प्रयोगासाठी या रक्कमेतून गुंतवणूक करण्यात येणार आहे.
VerSe Innovationचे संस्थापक वीरेंद्र गुप्ता आणि सह-संस्थापक उमंग बेदी यांनी सांगितले की, आम्ही सीपीपी इन्व्हेस्टमेंट, ओंटारियो टीचर्स, लक्सर कॅपिटल आणि सुमेरू व्हेंचर्स सारख्या मोठ्या संस्थांसोबत भागीदारी करत असल्याचा आनंद वाटत आहे. ही भागिदारीमुळे युजर्सना अधिक चांगला, गुणवत्तापूर्वक असलेला कंटेट देण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या गुंतवणूकीमुळे कोट्यवधी युजर्सना स्थानिक भाषेत चांगला, दर्जेदार कंटेट उपलब्ध होण्यास मोठी मदत मिळेल.
भारतामध्ये प्रादेशिक भाषांमधील व्हिडिओ कंटेटच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून त्यादृष्टीने आम्ही पावले टाकत आहोत आणि लक्ष्य निश्चित केले असल्याचे गुप्ता आणि बेदी यांनी संयुक्त निवेदनात म्हटले.
VerSe Innovation या स्टार्टअपची स्थापना विरेंद्र गुप्ता यांनी 2007 मध्ये केली होती. उमंग बेदी हे 2018 मध्ये या कंपनीत रुजू झाले. कंपनीने 2020मध्ये 'जोश' हा शॉर्ट व्हिडिओ अॅप लाँच केला. टिकटॉकवरील बंदीनंतर हा अॅप लाँच झाल्याने युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha