Cryptocurrency News: सलग सहाव्या दिवशी बिटकॉईनचा दर घसरला
Cryptocurrency News : रशिया आणि युक्रेनमधील तणावाचा परिणाम शेअर बाजाराप्रमाणे क्रिप्टोबाजारावरही दिसून येत आहे.
Crypto Currency : जगातील सर्वात लोकप्रिय आणि क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनच्या दरात सलग सहाव्या दिवशी घसरण झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या परिणामी बिटकॉइनच्या दरात घसरण झाली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. बिटकॉइनचा दर 30 हजार डॉलरपेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये बिटकॉइनची 68 हजार डॉलर झाली आहे.
क्रिप्टो एक्सचेंज WazirX नुसार, बिटकॉइनची किंमत आज सहा टक्क्यांहून अधिक घसरली आहे. बिटकॉइनची किंमत आज 36,813 डॉलर म्हणजेच 29,11,025 रुपयांवर व्यवहार करत आहे. बिटकॉइनची किंमत गेल्या आठवड्यात 40,000 डॉलरच्या खाली गेली. युक्रेनचे संकट अधिक गडद झाल्यामुळे त्यात आणखी घसरण झाली. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठं क्रिप्टोकरन्सी इथर 7.64 टक्क्यांनी घसरली आहे. सध्या इथरचा दर 2529 डॉलर इतका आहे.
सोन्याच्या दरात वाढ:
रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागांना मान्यता देणार असल्याचे सांगितल्यानंतर युक्रेनच्या संकटामुळे भारतातील सोन्या-चांदीच्या किंमतीत 22 फेब्रुवारीला (मंगळवारी) वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX), सोन्याचे फ्युचर्स 0. 75 टक्क्यांनी वाढून सोन्याचा दर 50,454 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदीचा दर 1.13 टक्क्यांनी वाढून 64,426 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर :
जागतिक बाजारात, सोन्याच्या किंमती जवळपास नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. स्पॉट सोन्याचा दर 0.2 टक्क्यांनी वाढून $1,909.54 प्रति औंस झाला आहे. जागतिक बाजारात स्पॉट सिल्व्हर 0.9 टक्क्यांनी वाढून 24.14 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनम 0.9 टक्क्यांनी वाढून 1,083.68 डॉलर आणि पॅलेडियम 0.8 टक्क्यांनी वाढून 2,406.24 डॉलरवर पोहोचला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Share Market : रशिया-युक्रेन वाद; शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha