Share Market : रशिया-युक्रेन वाद; शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
Stock Markets Down : शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1000 अंकांनी गडगडला.
Stock Markets Down : रशिया आणि युक्रेन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाचा फटका शेअर बाजारालाही बसला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 1001.61 अंकांनी कोसळला. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही घसरण दिसून आली.
रशिया-युक्रेनच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्री-ओपनिंग सत्रात मोठी घसरण दिसून आली. निफ्टी 358 अंकांनी म्हणजे जवळपास 2.08 टक्क्यांनी कोसळला. निफ्टी 16,876 अंकांवर ट्रेड करत आहे. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1110 अंकांनी कोसळला होता. सेन्सेक्स 56,542 अंकांवर ट्रेड करत होता. युद्धाच्या सावटामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केला आहे.
शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रतील स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. बँकिंग क्षेत्रातील शेअर्स गडगडले आहेत. मिड कॅप, स्मॉल कॅपमध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 स्टॉक्समधील सर्व स्टॉक्सच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
मॉस्को शेअर बाजारात घसरण
सोमवारी, मॉस्को शेअर बाजार तब्बल 14 टक्क्यांनी कोसळला. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेनसोबत संघर्षाचे संकेत मिळत होते. रशियाच्या हद्दीत घुसलेल्या युक्रेनच्या लष्करी वाहनांना उद्धवस्त केल्याचे वृत्त समोर आले होते. याच्या परिणामी मॉस्को शेअर बाजारात मोठी पडझड झाली. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारावरही युद्ध तणावाचे पडसाद दिसून आले. आता, मंगळवारी भारतीय शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
मॉस्को शेअर बाजाराचा निर्देशांक RTS मध्ये रशियातील 50 मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करतो. मॉस्को शेअर बाजारात जवळपास 230 अंकांची म्हणजे 16.67 टक्क्यांनी कोसळून निर्देशांक 1160.24 अंकावर आला होता. युद्ध तणावाच्या परिणामी रशियन रुबल हा डॉलरच्या तुलनेत आणखी कमकुवत झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 78 रुबलपर्यंत घसरला होता. युद्ध सुरू झाल्यास रशियावर पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रशियातील गुंतवणूकीवरही होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
- Explainer : रशियानं युक्रेनमधील प्रांताबाबत घेतलेल्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha