(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Senior Citizen Special FD Scheme : 'या' दिग्गज बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली खास FD योजना, जाणून घ्या किती मिळणार व्याजदर
Senior Citizen Special FD Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Senior Citizen Special FD Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील काही दिग्गत बँक आता ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI BANK), एचडीफसी बँक (HDFC BANK) आणि आयसीआयसीआय बँकेचा (ICICI BANK) समावेश आहे. चला तर जाणून घेऊ या बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर किती व्याजदर देत आहेत.
एचडीएफसी बँक एफडी योजना
एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना HDFC Senior Citizen Care सुरू केली आहे. ही योजना 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरवर लागू आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर एफडी अंतर्गत मुदत ठेव केली, तर त्यांना 6.35 टक्के व्याज मिळेल.
एसबीआय बँक एफडी योजना
एसबीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI WeCare योजना सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत यात गुंतवणूक करू शकतात. या योजनेंतर्गत बँक 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या मुदत ठेवींवर 5.50 टक्के व्याजदर देत आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांना SBI WeCare अंतर्गत विशेष एफडी योजनेवर बँक 6.30 टक्के व्याज देत आहेत.
आयसीआयसीआय बँक एफडी योजना
आयसीआयसीआय बँकेने देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना आणली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजनेवर 6.35% दराने व्याज दिले जाणार आहे. हे दर 8 एप्रिल 2022 पर्यंत आयसीआयसीआय बँकेसाठी लागू आहेत. आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या साइटवर सांगितले की, हे व्याजदर 20 जानेवारी 2022 पासून लागू आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेणाऱ्यांना एलआयसीचा इश्यू स्वस्त मिळणार
- Share Market : रशिया-युक्रेन वाद; शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?