प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेणाऱ्यांना एलआयसीचा इश्यू स्वस्त मिळणार
Modi govt schemes : ज्या पॉलिसीधारकांकडे एलआयसीच्या एक किंवा अधिक पॉलिसी आहेत त्यांना आरक्षण आणि सवलतीचा लाभ मिळेल.
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) घेणारे एलआयसीचा इश्यू स्वस्तात खरेदी करू शकतात. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी ही माहिती दिली आहे. कुमार म्हणाले, केंद्राची ही योजना देखील आमचा भाग आहे आणि त्यामुळेच ही योजना घेणाऱ्यांना पॉलिसीधारकांसाठी निश्चित केलेल्या आरक्षणाचा लाभ देखील मिळेल.
एलआयसीने गेल्या आठवड्यात 13 फेब्रुवारी रोजी इश्यूसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (DRHP) मसुदा सादर केला. त्यानुसार, इश्यूचा एक भाग पॉलिसी धारकांसाठी राखीव आहे. कंपनीने आपल्या अर्जात म्हटले आहे की, ज्या पॉलिसीधारकांकडे एलआयसीच्या एक किंवा अधिक पॉलिसी आहेत त्यांना आरक्षण आणि सवलतीचा लाभ मिळेल.
DRHP नुसार, 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. तर एलआयसी कर्मचार्यांसाठी 5% राखून ठेवले आहे. 10% इश्यू पॉलिसी धारकांसाठी राखीव आहे. म्हणजेच एलआयसीचे पॉलिसीधारक रिटेल आणि पॉलिसीधारक या दोन्ही श्रेणींमध्ये अर्ज करू शकतात.
सवलत कशी मिळवाल?
सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या एलआयसी पॉलिसी धारकांना त्यांची पॉलिसी पॅनशी लिंक करावी लागेल. पॉलिसी पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. हे काम 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास, तुम्ही पॉलिसीधारकांच्या श्रेणीमध्ये अर्ज करू शकत नाही आणि तुम्हाला स्वस्तात IPO मिळू शकणार नाही.
एलआयसीचा आयपीओ यावर्षी मार्चमध्ये लिस्ट होणार आहे. लिस्टिंग केल्यानंतर, कंपनीचे बाजार मूल्यांकन RIL आणि TCS सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काय?
ही विमा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांसाठी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकांना कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळेल. यामध्ये वार्षिक 330 रुपये प्रीमियम भरावा लागतो. ही योजना एलआयसी आणि इतर विमा कंपन्यांनी बँकांशी करार करून दिली आहे.