तुम्हाला मुकेश अंबानी एवढी संपत्ती मिळवायला किती वर्षे लागतील? असं आहे कॅल्क्युलेशन
तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्हीही मुकेश अंबानी यांच्यासारखे श्रीमंत होऊ शकता? तुम्हालाही त्यांच्याएवढी संपत्ती मिळविण्यासाठी किती वर्षे लागतील? पाहुयात याबाबतची माहिती.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी हे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्हीही त्यांच्यासारखे श्रीमंत होऊ शकता? तुम्हालाही त्यांच्याएवढी संपत्ती मिळविण्यासाठी किती वर्षे लागतील? चला समजून घेऊया ते कॅल्क्युलेशन...
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी हे जगातील टॉप-15 श्रीमंत लोकांमध्ये आहेत. त्यांच्याकडे भारतातील सर्वात मोठी दूरसंचार आणि रिटेल कंपनी आहे. तर जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिफायनरीही त्यांच्याकडे आहे. स्वतःचे खासगी जेट, अँटिलियासारखे घर आणि आलिशान वाहनांनी भरलेले सहा मजले पार्किंग, शेवटी त्यांच्यासारखी जीवनशैली कोणाला आवडणार नाही? इतकी संपत्ती कमवायला तुम्हाला किती वर्षे लागतील याचा कधी विचार केला आहे का?
फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची सध्याची एकूण संपत्ती 90.5 अब्ज डॉलर आहे. रुपयांमध्ये ही रक्कम 7 हजार 526.98 अब्ज रुपये आहे. तर कोटींमध्ये मोजले तर ते 7,52,698 कोटी रुपये आहेत. जर आपण आकडेवारीत पाहिले तर मुकेश अंबानी हे 7,527 अब्ज रुपयांचे मालक आहेत.
एवढी संपत्ती कमवायला तुम्हाला किती वर्षे लागतील?
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न वार्षिक 1.70 लाख रुपये आहे. गणिते सोपी करण्यासाठी, जर आपण सामान्य माणसाचा पगार 1,00,000 रुपये प्रति महिना आहे असे गृहीत धरले तर त्याचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये होईल. तुम्हाला मुकेश अंबानींच्या सध्याच्या संपत्तीचे वार्षिक 12 लाख रुपये या दराने मालक व्हायचे असेल, तर तुम्हाला 62,72,483 वर्षे लागतील.
मानवजातीचा संपूर्ण इतिहास संपेल
मुकेश अंबानींइतकी संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण आधुनिक मानवी संस्कृतीचा इतिहास संपेल. विज्ञानाच्या भाषेत आधुनिक मानव जातीला Homo Sapiens Sapiens म्हणतात. दोन पायांवर चालणार्या प्राण्यांपासून मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्याचा विचार केला तर अशा मानवी प्रजातींचे पहिले उदाहरण सुमारे 58 लाख वर्षे जुने आहे. Homo Sapiens Sapiens, म्हणजेच दोन पायांवर उभे राहून सरळ चालण्याची क्षमता असलेला मानवही सुमारे 20 लाख वर्षांचा आहे. मानवाने 16 लाख वर्षांपूर्वी आग शोधली. अशाप्रकारे, मुकेश अंबानींइतकी संपत्ती कमवायला तुम्हाला संपूर्ण मानवजातीच्या इतिहासाइतकी वर्षे लागतील.
महत्त्वाच्या बातम्या: