उद्याचा अर्थसंकल्प युवकांची 'मन की बात' करेल का? सत्यजित तांबेंचा सवाल
उद्या संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पातून विविध अपेक्षा करण्यात आल्या आहेत. उद्या सादर होणार अर्थसंकल्प युवकांची ' मन की बात' करेल का? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे.
satyajeet tambe : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अशातच विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची तयारी देखील केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उत्तम चर्चा व्हावी असं आवाहन केलं आहे. दरम्यान, उद्या संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पातून विविध अपेक्षा करण्यात आल्या आहेत. उद्या सादर होणार अर्थसंकल्प युवकांची ' मन की बात' करेल का? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे. उद्याच्या अर्थसंकल्पातून युवकांना नेमकं काय मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पू्र्ण होत असून, या अर्थसंकल्पाला विशेष महत्व आहे. एका बाजूला पाच राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत, तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून देश बाहेर येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा अर्थव्यवस्थेचा विकासदर थोडासा वाढत असताना दिसत असला तरी महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावत वाढली असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
तरुणांच्या नेमक्या अपेक्षा काय?
बेरोजगारी
देशातील बेरोजगारीने गंभीर पातळी गाठली असून, सीएमआयईच्या अहवालातून सुमारे 19 कोटी युवक नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत असल्याचे समोर आले आहे. मागच्या आठवड्यात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रेल्वे भरतीत गोंधळ झाल्यामुले हजारो युवक रस्त्यावर उतरले होते. यावेळी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी युवकांवर लाठीहल्ला केला होता. जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगात नोकरी मिलवण्याचा सरासरी दर हा 55 टक्के आहे. तर हाच दर भारतात फक्त 43 टक्के असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. 2014 मध्ये मोदी सरकारने सत्तेवर येण्याआधी प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करु असे आश्वासन दिले होते. आता येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत ठोस उपाययोजना केल्या जातील का पाहमे महत्त्वाचे ठरणार असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.
स्वयंरोजगार
रोजगार मागणारे नाही तर रोजगारदेणारे बना असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. उद्योजक घडवण्यासाठी सुरू करण्यात आलेली स्टार्ट अप इंडिया ही योजना फारशी यशस्वी झाली नसल्याचे तांबे म्हणालेत. उद्योजक घडवण्यासाठी शिक्षण, आर्थिक पाटबळ, व्यापारसुलभता, कायदेशीर स्पष्टता अशा सर्व बाबींची पूर्तता करुन एक इकोसिस्टम तयार करावी लागते. नवीन उद्योजक तरुणांना नियोजनााचे तंत्र शिकवावे लागते. भारतात गेल्या काही वर्षात अनेक स्टार्टअप सुरू झाले असले तरीदेखील उद्योजकतेसाठी लागणारी इकोसिस्टम विकसीत झाली नसल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात अपेक्षीत धोरणे येतील असे तांबे यांनी म्हटले आहे.
शिक्षण आणि कौशल्य विकास
कोरोनाच्या संकटामुले जवळपास 3 वर्ष शाळा आणि महाविद्यालये बंद होती. यादरम्यान, शिक्षण ऑनलाईन असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. एका बाजूला डिजीटल दरी तयार झाली तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा कम्प्यूटर आहे त्यांनादेखील प्रॅक्टीकल्स नसल्याने ज्ञानात कमतरता भासत आहे. अशा स्थितीत दोन्ही गटांना जॉब मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. या स्थितीत तरुणांसाठी सॉफ्ट स्किल आणि सोशल स्किल विकसीत कोर्स तयार झाले आहेत. कोशल्या विकास मंत्रालयातर्फे असे कोर्स राबवून तरुण तरुणांनी जॉब रेडी करता येण्यासारखे आहे. त्यामुळे अर्थमंत्री तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमास प्राधान्य देतील असे तांबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 2020 साली भारत देश महासत्ताक होण्याचे स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती आणि युवकांचे आयकॉन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या देशातील तरुणांमध्ये आहे, हे ते जाणून होते. आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील तरुण रस्त्यावर उतरून हक्काच्या नोकरीसाटी आंदोलन करत आहे. हे चित्र पाहून अब्दुल कलाम नक्कीचे दु:खी झाले असते असे तांबे म्हणालेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी उद्याच्या अर्थसंकल्पात तरुणांची मन की बात एकली जाईल असी अपेक्षा असल्याचे सत्यजित तांबे म्हणालेत.