(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Budget 2023 : आत्मनिर्भर भारत ते भ्रष्टाचारमुक्त भारत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Budget 2023 : आत्मनिर्भरतेमुळे भारत मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांनी केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
नवी दिल्ली: संसदेचं अर्थसंकल्पीय (Budget 2023) अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मोदी (PM Modi Government) सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरुवात ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. इतर देशांवर अवलंबून असलेला भारत आता जगभरातील दुसऱ्या देशांच्या समस्या सोडवू लागला आहे. आत्मनिर्भरतेमुळे भारत मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांनी केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
भ्रष्टाचार
भ्रष्टाचार ही लोकशाहीला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू आहे. व्यवस्थेत काम करताना प्रामाणिक व्यक्तींचा सन्मान झाला पहिजे याची सरकारने काळजी घेतली आहे. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी इको-सिस्टम तयार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. बेनामी मालमत्ता कायदा अधिसूचित करण्यात आला आहे. आर्थिक गुन्ह्यांमधून फरार झालेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदा करण्यात आला आहे.
रिफंड लवकर मिळण्यास मदत
टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु आता ITR भरल्यानंतर काही दिवसातच रिफंड मिळते . आज जीएसटीच्या माध्यमातून पारदर्शकतेसोबतच करदात्यांची प्रतिष्ठा खात्री केली जाते.
आयुष्मान भारत योजना
आयुष्मान भारत योजनेचा अनेकांना फायदा झाला आहे. या योजनेने 80,000 कोटी रुपये वाचवले आहे. या योजनेंतर्गत 50 कोटींहून अधिक देशवासीयांसाठी मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत
300 योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात
जन धन योजनेपासून ते वन नेशन वन रेशन कार्डपर्यंत बनावट लाभार्थी काढून टाकण्यापर्यंत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहे. गेल्या काही वर्षांत डीबीटीच्या, डिजिटल इंडियाच्या रूपात देशाने कायमस्वरूपी आणि पारदर्शक व्यवस्था तयार केली आहे. 300 योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचले आहेत.
छोट्या शेतकऱ्यांना 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक मदत
देशात 11 कोटी छोटे शेतकरी आहेत. हे शेतकरी सरकारी सुविधांपासून वंचित होते. आता त्यांना सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केले जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत छोट्या शेतकऱ्यांना 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांमध्ये तीन कोटी महिला लाभार्थी आहेत. या महिलांना 54 हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
मेक इन इंडिया मोहीम आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा फायदा
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मेक इन इंडिया मोहीम (Make in India) आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा फायदा देशातील नागरिकांना मिळत आहे. यामुळे देशाटी उत्पादन क्षमताही वाढत आहे आणि जगभरातून उत्पादक कंपन्या भारतात येत आहेत. भारतात बनवलेल्या वस्तूंची निर्यात सातत्याने वाढत आहे. काही वर्षापूर्वी भारत मोबाईल फोनची आयात करत होता. परंतु आता देश फोनची निर्यात करणारा मोठा देश बनला आहे. लहान मुलांची खेळण्यांच्या आयातीमध्ये देखील मोठी घट आली असून निर्यात वाढली आहे. 60 टक्क्यांनी निर्यात वाढली आहे.
इनोव्हेशनवर भर
देशाच्या संरक्षण उत्पादनामध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत सैन्यात दाखल झाली आहे. सरकारने नवोपक्रम आणि उद्योजकतेवर खूप भर दिला आहे. 2015 साली भारत ग्लोबल इनोवेशन इंडेक्समध्ये 81 व्या स्थानावर होता. आता तो 40 व्या स्थानावर गेला आहे. सात वर्षापूर्वी रजिस्टर्ड स्टार्टअपची संख्या शंभरवर होती. आता यामध्ये भर पडली असून आता ही संख्या 90 हजाराांवर गेली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवसांचं असून ते दोन टप्प्यात चालणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील. तर उद्या अर्थमंत्री 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.