Budget 2021 | भारताकडे आधीच कोरोनाच्या दोन लसी, आणखी दोन लसी येणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Budget 2021 : सध्या देशात दोन कोरोना लसी उपलब्ध असून आणखी दोन लवकरच येणार असल्याची घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.
Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोरोना लसीबाबत मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आपल्याकडे दोन वॅक्सिन आहेत आणि दोन आणखी वॅक्सिन लवकरच येणार आहेत." अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे देशात कोरोना लसीकरण कार्यक्रम आणखी सक्षमपणे देशभरात राबवण्यास मदत होईल. देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस उपलब्ध आहे. या दोन्ही वॅक्सिनचा वापर सध्या देशभरातील लसीकरणासाठी करण्यात येत आहे.
अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "कोरोना महामारीमध्ये सरकारने प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवली होती. आम्ही कोरोना विरुद्ध नागरिकांच्या आरोग्याला सुरक्षित करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच आज भारताकडे दोन कोरोना लसी आहेत."
कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकार 35 हजार कोटी देणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, सरकारने आरोग्य आणि आरोग्य क्षेत्रातचं बजेट 94 हजार कोटी रुपयांवरून 2.38 लाख कोटी रुपये केलं आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील.
केंद्र सरकारने 100 हून अधिक देशातील लोकांना कोरोनाविरुद्ध सुरक्षा प्रदान केली आहे. पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना श्रेय देत या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केली. भारत खरोखरच शक्यता आणि अपेक्षेचा देश होण्यासाठी तयार आहे, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. या व्यतिरिक्त त्या म्हणाल्या की 2020-21 या आर्थिक वर्षात सरकारने 4.21 लाख कोटी रुपये खर्च केले. 2021-22 या आर्थिक वर्षात सरकारने 4.39 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी आरोग्य क्षेत्राचे बजेट 94 हजार कोटीवरून 2.38 लाख कोटी करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :- Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून 'नाशिक मेट्रो' चे कौतुक, प्रकल्प आता देशपातळीवर राबवण्याची घोषणा
- Budget 2021 : विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांवर योजनांची खैरात, महाराष्ट्रासाठी काय?
- Union Budget 2021: सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला; अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात तेजी
- Budget 2021: ज्येष्ठ नागरिकांची आयकर परतावा भरण्याच्या कटकटीतून सुटका, पण..