एक्स्प्लोर

Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'

Ajay Bhatt: अजय भट्ट यांच्या सल्ल्यावरून सोशल मीडियात त्यांच्यावर सडकून प्रहार सुरु आहे. आस्थेचा सन्मान असायला हवा, राजकीय तमाशा नाही, अशाही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  

Ajay Bhatt Viral Video: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मनरेगावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. मनरेगाऐवजी नवीन धोरण आणल्याबद्दल आणि योजनेचे नाव बदलल्याबद्दल इंडिया आघाडीकडून जोरदार प्रहार केला जात आहे. नवीन योजनेतून महात्मा गांधींचे नाव वगळले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावर थेट सरकारवर हल्लाबोल केला. काल संसदेत या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली, ज्यामध्ये नैनिताल-उधमपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार अजय भट्ट यांनी थेट नोकरी लागत नसेल, मुलगीचं लग्न होत नसेल जय  श्री राम जय जय राम म्हणण्याचा सल्ला दिला. अजय भट्ट यांच्या सल्ल्यावरून सोशल मीडियात त्यांच्यावर सडकून प्रहार सुरु आहे. आस्थेचा सन्मान असायला हवा, राजकीय तमाशा नाही, अशाही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  

प्रत्येक समस्या सुटेल

अजय भट्ट म्हणाले की, "राम हा एक सिद्ध मंत्र आहे, जप जो सर्वकाही साध्य करतो. जर तुमच्या मुलीचे लग्न होत नसेल तर राम राम म्हणा. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर राम राम म्हणा. जर घरात भांडणे होत असतील तर राम राम म्हणा. जर पती-पत्नीमध्ये मतभेद असतील तर राम राम म्हणा. जर नाते बिघडले असेल तर राम राम म्हणा. जरी गाय दूध देत नसेल तरी राम राम म्हणा. प्रत्येक समस्या सुटेल."

योजनाची नावे बदलून बदल होणार नाही

अजय भट्ट यांच्या सल्ल्यामुळे संसदेत आणि संसदेबाहेर चर्चा सुरू झाली आहे. संसदेतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओवरील लोकांनी अजय भट्ट यांना आरसा दाखवला आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. योजनांच्या नावात रामाचे नाव समाविष्ट करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. बदल योजनांची नावे बदलून नाही तर पुरेसा रोजगार देऊन येईल. दुसरीकडे, अजय भट्ट म्हणाले की, "राम, हे राम, श्री राम, जय राम, जय जय राम" हा नऊ शब्दांचा मंत्र महात्मा गांधींनी स्वतः स्वीकारलेला एक सिद्ध मंत्र आहे. त्यामुळे त्यात काहीही चुकीचे किंवा आक्षेपार्ह नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget