एक्स्प्लोर

Agriculture Budget 2024 : केंद्राचं लक्ष आता नैसर्गिक शेतीकडे, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर योजना, कसा होणार फायदा?

Agriculture Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीबाबत मोठी घोषणा केली आहे. कृषी क्षेत्रासाठी तब्बल 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Agriculture Budget 2024 : मोदी 3.0 सरकारचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. यात कृषी क्षेत्रासाठी तब्बल 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नैसर्गिक शेतीसाठी (Natural Farming) केंद्र सरकारने (Central Government) महत्वाचे पाऊल उचलले असून याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

निर्मला सीतारामन कृषी क्षेत्राशी निगडीत घोषणा करताना म्हणाल्या की, कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कृषीची विकासासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं सरकारकडून उचलली जाणार आहेत. आगामी वर्षात नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारकडून घेण्यात आला आहे. पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे त्यांनी म्हटले. 

केंद्राचं लक्ष आता नैसर्गिक शेतीकडे

गेल्या दोन दशकात आमचे सरकार नैसर्गिक शेतीवर जोर देत आहे. सध्या बाजारात सेंद्रीय उत्पादनाला चांगला भाव मिळतोय. जागतिक बाजारात सेंद्रीय गहू, तांदूळ यांच्यासह अनेक गोष्टींना चांगला भाव मिळत असल्याने नैसर्गिक शेतीबाबत मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

नैसर्गिक शेतीसाठीची योजना काय? 

शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असून यासाठी ग्रामपंचायत केंद्रस्थानी असणार आहे. देशात 10 हजार बायो रिसर्च सेंटर तयार केली जातील. 32 पिकांच्या 109 जाती आणल्या जाणार आहेत.  देशातील 400 जिल्ह्यातील पीकांचे डिजिटल सर्वेक्षण करण्यात येईल. देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीबाबतचे प्रशिक्षण आणि माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. यानंतर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड देण्याचीही घोषण केली आहे. केंद्र सरकारद्वारे पाच राज्यात जन समर्थ आधारीत किसान क्रेडीट कार्ड जारी केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

कृषी क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा

  • नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार
  • कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर 
  • डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर 
  • शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड  डिजिटल होणार
  • शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.
  • या वर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे
  • सोयाबीन आणि सुर्यफुल बियांची साठवण वाढवणार
  • 32 फळ आणि भाज्यांच्या 109 जाती वितरीत करणार

आणखी वाचा 

Budget 2024 Jobs: देशातील नोकऱ्या वाढवण्यासाठी मोदी सरकारच्या तीन गेमचेंजर योजना, पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना 15 हजारांचा Incentive

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!Raj Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन #abpमाझाEknath Shinde Oath as Maharashtra DCM :मी एकनाथ शिंदे..उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतली शपथABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines Oath ceremony 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Maharashtra CM Oath Ceremony : ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
Embed widget