एक्स्प्लोर

Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?

Eknath Shinde oath taking ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्त्वाचा मोहरा कसा झाला? एकनाथ शिंदे यांचा शपथविधी.

Eknath Shinde taking Oath as deputy chief minister: राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात (Mahayuti Govt Oath taking Ceremony) राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आझाद मैदानावरील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. शिवसेनेचा एक साधा शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास स्वप्नवत असाच म्हणावा लागेल. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) एकहाती 132 जागा जिंकल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे मनसुबे सफल झाले नसले तरी आताच्या घडीला एकनाथ शिंदे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य घटक झाला आहे.

एकनाथ शिंदे यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतील अन्य कोणत्याही बड्या नेत्याप्रमाणे साधा शिवसैनिक आणि शाखाप्रमुख म्हणूनच झाली होती. मात्र, आता तेच एकनाथ शिंदे हे आज निवडणूक आयोग, न्यायालय आणि जनमताच्या कौलानुसार खरे शिवसेना पक्षप्रमुख झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यांना कुत्सितपणे रिक्षावाला म्हणून हिणवले होते. मात्र, त्याच एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंपेक्षा जास्त आमदार निवडून आणत खरी शिवसेना कोणाची, हे एकप्रकारे ठाकरेंना दाखवून दिले. 

आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून एक नवी जबाबदारी स्वीकारत आहेत. भाजपला मिळालेल्या प्रचंड यशामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाटचाल ही आव्हानात्मक असेल. उद्धव ठाकरे आणि देशातील अन्य प्रादेशिक पक्षाप्रमांणेही आपली गत होऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांना अत्यंत सावधपणे आणि चाणाक्षपणाने पुढील राजकीय वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे आता हे अग्निदिव्य एकनाथ शिंदे कशाप्रकारे पार करणार, हे पाहावे लागेल.

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द 

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात·
  • 1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती. शिवसैनिक या नात्याने अनेक आंदोलनांमध्ये सहभाग. सीमा आंदोलनात तुरुंगवासही भोगला·
  • 1997 साली पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले·
  • सन 2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड. सलग तीन वर्षे पद सांभाळले·  
  • सन 2004मध्ये त्यावेळच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी·
  • सन 2005 मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती.
  • सन 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार·  
  • सन 2014 साली विजयाची हॅटट्रिक. विरोधी पक्षनेतेपदी निवड·
  • डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ. एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला·  
  • जानेवारी 2019 मध्ये नगरविकास मंत्रिपदी निवड.
  • सन 2022 -2024- मुख्यमंत्री ,नगरविकास मंत्रीपद 

आणखी वाचा

बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Accident Car Airbag Death : कारमध्ये मुलांना पुढं बसवताय? हा व्हिडीओ पाहा Special ReportTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 24 December 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Cabinet Minister : मंत्रिपदी बढती, सुरु झाली झाडाझडती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Embed widget