ABP Cvoter Survey On Budget: चार जणांच्या कुटुंबाचं प्रत्येक महिन्याचं उत्पन्न किती असावं? पाहा जनतेचा कौल
ABP News Cvoter Survey On Budget : पाच राज्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय रणसंग्रमात एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
ABP News Cvoter Survey On Budget : पाच राज्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय रणसंग्रमात एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय घोषणा केल्या जातील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कोरोना महामारीच्या विरोधात देश लढत आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच खूप आपेक्षा आहेत. मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आणि निम्न स्तरातील लोकांना सध्या मोठ्या आर्थिक समस्याचा सामना करावा लागत आहे. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलेय. हे सर्व पाहाता सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पाहूण एबीपी न्यूजने सी वोटरच्या माध्यमातून सर्व्हे केला आहे.
चार जणांच्या कुटुंबाचं प्रत्येक महिन्याचं उत्पन्न किती असावं? असा प्रश्न सी वोटरच्या सर्व्हेत जनतेला विचारण्यात आला होता. यामध्ये लोकांना विविध पर्याय दिले होते. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यापैकी 29 टक्के लोकांनी सांगितले की, चार जणांच्या कुटुंबाचं प्रत्येक महिन्याचं उत्पन्न 20 हजारपर्यंत असायला हवं. त्याशिविया 15 टक्के लोकांनी सांगितले की 20 ते 30 हजारांपर्यंत उत्पन्न असायला हवं असे सांगितले. 17 टक्के लोकांनी सांगितले की 30 ते 40 हजारांचे उत्पन्न असायला हवे. त्याशिवाय सात टक्के लोकांना वाटते की चार व्यक्तीच्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न 40-50 हजार रुपये असायला हवं. 21 टक्के लोकांनी सांगितले की, 50 हजार ते एक लाखांच्या दरम्यान मासिक उत्पन्न असायला हवं. 11 टक्के लोकांना वाटतेय की, इतक्या मोठ्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असायला हवं.
Cvoter Survey : चार जणांच्या कुटुंबाचं प्रत्येक महिन्याचं उत्पन्न किती असावं?
20 हजारपर्यंत-29%
20-30 हजारपर्यंत-15%
30-40 हजारपर्यंत -17 %
40-50 हजारपर्यंत -7%
50 हजार- 1 लाखांपर्यंत-21%
1 लाखांपेक्षा जास्त - 11%
Cvoter : या कमाईला करमुक्त करायला हवं का?
हो - 83%
नाही -17%