एक्स्प्लोर

Amol Mitkari : राहुल सोलापूरकरांना दिलेली क्लीन चीट देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखीच; अमोल मिटकरी पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले

Amol Mitkari : राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याचे वक्तव्य पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले होते.

Amol Mitkari : राहुल सोलापूरकरांच्या (Rahul Solapurkar) वक्तव्यांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याचे विधान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी केले होते. अमितेश कुमार यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलीये. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी साहित्य संमेलनाला दलालांचे संमेलन, असे  संबोधले होते. यावरून अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. तर लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार, असेही त्यांनी म्हटले आहे. 

अमोल मिटकरी यांनी आज गुरुवारी (दि. 13) अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याचे विधान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले होते. याबाबत अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, अमितेश कुमार यांनी एक प्रकारे राहुल सोलापूरकर यांना दिलेली क्लीन चीट ही देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखीच असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अमितेश कुमार यांची तक्रार राज्याची उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार असल्याचं ते म्हणालेत. अमितेश कुमार यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसेल. तो माहीत करून घेण्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके पाठवणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. 

लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत मोठी इनकमिंग पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांनी याबाबत देखील भाष्य केले आहे. लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचं ते म्हणालेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार आणि आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा करत राष्ट्रवादीत कोणत्या मोठ्या नेत्यांचं इनमिंग होणार आहे हे लवकरच महाराष्ट्राला दिसणार, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

अमोल मिटकरींचा संजय राऊतांवर पलटवार

मंगळवारी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र, या पुरस्काराने राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता यावरून अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. संजय राऊतासारख्या पत्रकाराने साहित्य संमेलन आणि साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा 

Operation Tiger: ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी जेवले, एकजण एकनाथरावांच्या सत्काराला, ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याचे संकेत?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget