एक्स्प्लोर

Blue Dart Express: ब्लू डार्टने कुरिअर करताय? कंपनीचा मोठा निर्णय

Blue Dart Express: ब्लू डार्टने कुरिअर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. ब्लू डार्टची सेवा आता महागणार आहे. 1 जानेवारी 2024 पासून सर्वसामान्य दरांत वाढ होणार आहे.

मुंबई: ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड (Blue Dart Express Limited) ही दक्षिण आशियाची महत्त्वपूर्ण एक्सप्रेस एअर तसेच एकात्मिक वाहतूक आणि वितरण एक्सप्रेस लॉजिस्टीक कंपनी आहे. डीएचएल ग्रुपचा (DHL Group) भाग असणाऱ्या ब्लू डार्ट कंपनीने 1 जानेवारी 2024 पासून त्यांच्या सर्वसामान्य दरांत (Rates) वाढ होणार असल्याची घोषणा केली. ही सामान्य माल वाहतूक (शिपमेंट) दरवाढ 2023 च्या तुलनेत 9.6% एवढी असेल. नेमक्या कोणत्या मालाची वाहतूक करायची आहे, त्यावर दर अवलंबून असतील.

ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत

ब्लू डार्ट आपल्या हटके सेवा गुणवत्तेसह भविष्यात तयार पर्यायांमध्ये बाजार-नेतृत्वासाठी लोकप्रिय आहे, ही मानकं उद्योगातील एक्सप्रेस लॉजिस्टिक पुरवठादारांद्वारे देखील मापदंड ठरतात. आपल्या मौल्यवान ग्राहकांना सातत्याने लवचिक, विश्वासार्ह आणि कार्यक्षम उपाय वितरीत करण्यासाठी ब्लू डार्ट दरवर्षी त्याची किंमत पुनरावलोकन आणि समायोजित करते. हे समायोजन सध्याचे स्थूल आर्थिक घटक, जिओ पॉलिटीक्स तणाव, कडक आर्थिक आणि वित्तीय धोरणं, चलनवाढीचे दबाव आणि विनिमय दरातील चढउतार यासह अनेक घटकांचा विचार करते. या सर्वांचा खर्च संरचनेवर परिणाम होतो, यासाठी वाजवी दर समायोजनाची गरज आहे.

पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीची योजना

याव्यतिरिक्त, कंपनी हरित वाहतूक तंत्रज्ञान, स्मार्ट मार्ग नियोजन आणि स्वच्छ इंधनांमध्ये लक्षित गुंतवणुकीद्वारे CO2 उत्सर्जन कमी करून पर्यावरणीय जबाबदारीसाठी आपल्या अविरत वचनबद्धतेचे प्रदर्शन घडवते. ब्लू डार्टने डेटा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि चॅटबॉट, नवीन शिपिंग पोर्टल, सीमलेस मार्केटप्लेस प्लगइन्स आणि इतर उपक्रमांसह जागतिक दर्जाचा वापरकर्ता अनुभव प्रदान करण्यासाठी त्याच्या IT पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणुकीची योजना आखली आहे.

'ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं काम अविरत सुरू'

या घोषणेविषयी अधिक माहिती देताना ब्लू डार्टचे मॅनेजिंग डायरेक्टर बैलफर नुअल म्हणाले, मागील काही वर्षांपासून जागतिक स्तरावर उलथापालथ सुरू होती, त्यानंतर सध्या जागतिकीकरणात उत्क्रांतीचा उदय झाला आहे. आम्ही 2023 दरम्यान, अस्थिर जागतिक बाजारपेठेमुळे अनेक आव्हानांचा सामना केला. तरीही आमचे ग्राहक सेवांसाठी आमच्यावर अवलंबून असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे काम अविरत सुरूच आहे. आमच्या वार्षिक दर समायोजनाद्वारे आम्ही आमच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणुकीची घडी बसवत आहोत. आमचे लवचिक, टिकाऊ आणि वचनबद्धतेची व्याख्या करणारे उच्च-स्तरीय ग्राहक उपाय सुनिश्चित करत आहोत. यामध्ये आमच्या हवाई वाहतूक पायाभूत सुविधा आणि वाहनांच्या ताफ्यातील प्रगती, ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमच्या हब आणि गेटवेचा विस्तार आणि शाश्वत उपायांसाठी आमच्या समर्पणाचा समावेश आहे.

'विकसित ग्राहक उपायांची हमी'

ब्लू डार्टचे चीफ कर्मशियल ऑफिसर केतन कुलकर्णी म्हणाले, “आमच्या वार्षिक दर समायोजनांद्वारे, आम्ही पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी स्रोत जमवू शकतो, ज्यामुळे मजबूत, टिकाऊ आणि विकसित ग्राहक उपायांची हमी मिळते. कोणत्याही आव्हानांना सामोरे जात असतानाही, पुढे दिसणारा फायदा कायम ठेवण्याकरिता आम्ही आमच्या प्रणाली आणि कार्यपद्धतीला सातत्याने धारदार करतो. ऑटोमेशन आणि टेक्नॉलॉजी ही नेहमीच आमच्या कामकाजाची मूलभूत तत्त्वं राहिली आहेत, ज्यामुळे केवळ ग्राहकांना आनंद मिळत नाही तर पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणारे प्रामाणिक, व्यवहार्य निर्णय घेण्यास सक्षमता अंगी येते.”

इतरही सेवा देण्यावर भर

ई-कॉमर्स, लाईफसायन्सेस आणि हेल्थकेअर, ऑटोमोबाईल, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक, बँकिंग आणि फायनान्शियल सेवा तसेच विमा अशा विविध महत्त्वपूर्ण संघटनांकरिता एक सर्वपसंतीचा लॉजिस्टीक पुरवठादार म्हणून ब्लू डार्ट उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी, संक्रमणाचा काळ वाढवण्यासाठी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच भविष्यातील तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी सक्रियपणे गुंतवणूक करत आहे. या क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणून धोरणात्मक गुंतवणुकीची रचना स्पर्धात्मक धार सुरक्षित करण्यासाठी आणि लवचिकता आणि अनुकूलता राखण्यासाठी करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Nobel Prize: नोबेल पारितोषिक विजेत्यांना मिळतं 'इतक्या' कोटींचं बक्षीस; यासोबत आणखी काय मिळतं? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget