Nobel Prize: नोबेल पारितोषिक विजेत्यांना मिळतं 'इतक्या' कोटींचं बक्षीस; यासोबत आणखी काय मिळतं? जाणून घ्या
Nobel Prize Winners: नोबेल पारितोषिक विजेत्यांना या पुरस्कारासोबत इतरही अनेक गोष्टी मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना इतके पैसे मिळतात की याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
Nobel Prize 2023: वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील 2023 सालचा नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर करण्यात आला आहे. कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या याच शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 विरुद्ध प्रभावी ठरलेली mRNA लस विकसित करणं शक्य झालं. आता या विजेत्यांना नोबेल पारितोषिकासह किती पैसे बक्षीस म्हणून मिळणार ते पाहूया.
नोबेल पारितोषिकात किती पैसे मिळतात?
नोबेल पारितोषिक विजेत्यांना या पुरस्कारासोबत इतरही अनेक गोष्टी मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना बक्षीसरुपी इतके पैसे मिळतात की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. यासोबतच त्यांना जगभरात मिळणारी लोकप्रियता तर वेगळीच.
यावेळी नोबेल पारितोषिक जिंकलेल्या सर्व लोकांना 1.1 कोटी स्वीडिश क्रोनर मिळाले आहेत. जर आपण ते डॉलरमध्ये पाहिले तर ही किंमत सुमारे 9.86 डॉलर इतकी आहे. जर भारतीय रुपयांत बोलायचं झालं तर ती किंमत 8 कोटींपेक्षा जास्त होईल. पैशांसोबतच विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सुवर्णपदकही दिलं जातं.
पूर्वी मिळत नव्हते इतके पैसे
2020 मध्ये ही रक्कम 1 कोटी स्वीडिश क्रोनर होती. तर 2017 मध्ये ती 90 लाख स्वीडिश क्रोनर होती. 2012 बद्दल बोलायचे तर त्यावेळी नोबेल विजेत्यांना 80 लाख स्वीडिश क्रोनर देण्यात आले होते. म्हणजे कालांतराने बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रकमेतही वाढ झाली आहे.
जेव्हा 1901 मध्ये पहिल्यांदा नोबेल पारितोषिक देण्यात आलं तेव्हा प्रति श्रेणी पुरस्काराची रक्कम दीड लाख स्वीडिश क्रोनर होती. म्हणजेच, जर ती सध्याच्या भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केला तर ती 11 लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. नोबेल पारितोषिकाचं पहिलं बक्षीस 11 लाख रुपये होतं, जे आता 8 कोटींहून अधिक झालं आहे.
नोबेल पुरस्काराचा इतिहास
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पुरस्काराचं वितरण केलं जातं. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका संस्थेला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. पहिला नोबेल शांती पुरस्कार इ.स. 1901 मध्ये देण्यात आला होता.
हेही वाचा:
Nobel Prize Winner 2023: आतापर्यंत किती भारतीयांना मिळाला नोबेल पुरस्कार? पाहा संपूर्ण यादी