एक्स्प्लोर

ITR Status Check Online : ITR भरण्याच्या शेवटच्या दिवशी बँका असतील बंद; 'या' अडचणींचा करावा लागू शकतो सामना

ITR Status Check Online : ITR फाइल करण्याची अंतिम मुदत रविवारी, 31 जुलै रोजी येते, त्यादिवशी बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता वेळेतच आयटीआर भरा.

ITR Status Check Online : यावर्षी आयटी रिटर्न्स फाईल (Income Tax Return Filing Due Date)  करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. यंदाच्या वर्षी आयटी रिटर्न फाईल करण्याच्या शेवटच्या दिवशी रविवार आला आहे. त्यामुळे आयटी रिटर्न्स फाईल करण्याच्या शेवटच्या दिवशी यंदा बँका बंद असणार आहेत. त्यामुळे डेडलाईनपर्यंत वाट न पाहता, त्यापूर्वीच आयटी रिटर्न भरा. दरम्यान, आयटी रिटर्न्स ऑनलाईन फाईल करायचं असतं. त्यामुळे बँका बंद असल्यामुळे तुमचं कोणतंही काम अडणार नाही. 

काय उद्भवू शकते समस्या

रविवारी अनेक बँकांचं मेनटेनेंसचं (Maintenance) काम केलं जातं. त्या दिवशी अनेकदा नेटबँकिंग सेवा काही काळासाठी खंडीत केली जाते. तसेच, इंटनेटचा स्पीडही कमी असतो. त्याशिवाय शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर ई-फायलिंग पोर्टलवर ट्राफिकही (Income Tax E-Filing Portal) वाढते, त्यामुळे अनेकदा साइट क्रॅश होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेवटच्या दिवसांपर्यंत न थांबता लवकरात लवकर आयटी रिटर्न्स फाईल करा.  

TDS Certificate 

जर तुम्हाला आयकर भरायचा असेल, तर त्याला आयटीएनएस 280 सारखं चलन वापरावं लागतं. जर तुमच्याकडे ऑनलाइन बँकिंग (Online Banking) नसेल, तर तुम्हाला पेमेंटसाठी ब्रांचमध्ये जावं लागतं. तुम्हाला फॉर्म 16A म्हणजेच, TDS Certificate मिळविण्यासाठी बँकेत जावं लागेल. तुम्हाला ते ऑनलाइन मिळत नसले तरी तुम्हाला बँकेतच जावं लागू शकते. मात्र 31 जुलै रोजी रविवार असल्यानं बँका बंद असणार आहेत. 

Penalty Fee 1,000 ते 5,000 रुपये 

जर तुम्ही निर्धारित वेळेनंतर म्हणजेच, 31 जुलै 2022 नंतर आणि 31 डिसेंबर 2022 पूर्वी इन्कम टॅक्स  (Income Tax Retrun) रिटर्न भरला, तर तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. करदात्याचे वार्षिक करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, 1,000 रुपये दंड शुल्क भरावं लागेल.

नियम काय आहेत?

  • जर तुमचं वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांहून कमी आहे आणि तुम्ही 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरलात, तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.
  • पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यीं 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
  • पाच लाख रुपयांहून जास्त उत्पन्न असलेल्यांनी 31 जुलै ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत आपलं आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
  • पाच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांनी 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.

घर बसल्या अशा प्रकारे ITR फाइल करा 

  • सर्व प्रथम https://eportal.incometax.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर यूजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) टाका.
  • Continue या पर्यायावर क्लिक करा.
  • फाइल आयकर रिटर्न (File IT Return) पर्यायावर क्लिक करा आणि मूल्यांकन वर्ष निवडा.
  • ऑनलाइन (Online) पर्याय निवडा आणि नंतर वैयक्तिक (Personal) पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 फॉर्म निवडा.
  • पगार घेणाऱ्या व्यक्तीला ITR 4 फॉर्मची निवड करावी लागेल.
  • रिटर्न फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, त्यात भरलेल्या प्रकारावर 139(1) निवडा.
  • पुढे, तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये सर्व माहिती भरा.
  • सर्व भरलेल्या माहितीची पडताळणी करा आणि सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याचा Confirmation मेसेज तुमच्या मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
Embed widget