Bank Holidays : जानेवारी 2022 मध्ये 16 दिवस बँकांना सुट्टी; पाहा संपूर्ण यादी
New Year Bank Holidays : नव्या वर्षात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. तुम्ही तुमच्या बँकांच्या कामांचं नियोजन करण्यापूर्वी संपूर्ण यादी पाहाच.
New Year Bank Holidays : नवं वर्ष सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच नव्या वर्षात बँकेचे व्यवहार करण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांबाबत जाणून घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) जानेवारीमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी 2022 मध्ये देशभरातील सर्व बँका 16 दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान, साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त जानेवारीमध्ये इतर सुट्ट्यांमुळे विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
राज्यांनुसार सुट्ट्यांचं वेळापत्रक
देशभरातील विविध राज्यांमधील सण आणि उत्सवांनुसार, सुट्ट्यांचं वेळापत्रकही वेगळं आहे. लोसोंगच्या दिवशी गंगटोकमधील सर्व बँका बंद राहतील, तसेच या दिवशी इतर राज्यांतील बँकांचे व्यवहार सुरु राहतील. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी कोलकातामध्ये बँकांना सुट्टी असेल. आरबीआयने प्रादेशिक सुट्ट्या आणि कॅलेंडरवर आधारित बँकांसाठी विविध सुट्ट्या ठेवल्या आहेत. अवघ्या काही दिवसांत देशभरातील सर्व बँका बंद होणार आहेत. मात्र, बँकांच्या सुटीच्या काळातही ऑनलाइन बँकिंग सेवा सुरु राहतील. जानेवारी 2022 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी राज्यवार आणि साप्ताहिक सुट्ट्या येथे पाहू शकता.
जानेवारी 2022 मधील राज्यवार बँकांच्या सुट्ट्यांची यादी :
- 1 जानेवारी 2022 : नव्या वर्षाचा पहिला दिवस (देशभरात सुट्टी)
- 3 जानेवारी 2022 : नववर्षाचा उत्सव/लोसूंग (सिक्किम)
- 4 जानेवारी 2022 : लोसूंग (मिझोरम)
- 11 जानेवारी 2022 : मिशनरी दिवस
- 12 जानेवारी 2022 : स्वामी विवेकानंद यांची जयंती
- 14 जानेवारी 2022 : मकर संक्रांत (काही राज्यांमध्ये)
- 15 जानेवारी 2022 : पोंगल (आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडू)
- 18 जानेवारी 2022 : थाई पूसम (चेन्नई)
- 26 जानेवारी 2022 : प्रजासत्ताक दिन (देशभरात सुट्टी)
- 31 जानेवारी 2022 : मी-डॅम-मे-फी (आसाम)
जानेवारी 2022 मध्ये बँकांच्या आठवडी सुट्ट्या :
- 2 जानेवारी 2022 : रविवार
- 8 जानेवारी 2022 : दुसरा शनिवार
- 9 जानेवारी 2022 : रविवार
- 16 जानेवारी 2022 : रविवार
- 22 जानेवारी 2022 : चौथा शनिवार
- 23 जानेवारी 2022 : रविवार
- 30 जानेवारी 2022 : रविवार
महत्त्वाच्या इतर बामत्या :
- नव्या वर्षात महागाईपासून दिलासा मिळणार? आज जीएसटी परिषदेची बैठक
- वर्ष 2021 मध्ये क्रिप्टोचा बोलबाला, नव्या वर्षा इथरियम बिटकॉईनला मागे टाकणार?
- EPFO विभागाचा पीएफ खातेदारांना मोठा दिलासा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह