Audi Q5 Launched in India: ऑडी इंडियाची 'ऑडी क्यू 5' भारतात लॉन्च, किंमत आणि खासियत घ्या जाणून
Audi Q5 Launched in India: ऑडी क्यू 5 प्रीमियम प्लस (Premium Plus) आणि टेक्नोलॉजी (Technology) या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल
Audi Q5 launched: जर्मन लग्झरी कार निर्माता ऑडी कंपनीची (Audi) 'ऑडी क्यू 5' ( Audi Q5) कार आज भारतात लॉन्च झालीय. औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात या कारची निर्मिती करण्यात आलीय. ऑडी क्यू 5 प्रीमियम प्लस (Premium Plus) आणि टेक्नोलॉजी (Technology) या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. या कारची एक्सशोरूम किंमत अनुक्रमे 58 लाख 93 हजार रुपये आणि 63 लाख 77 हजार इतकी आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग धिल्लन म्हणाले की, “आज आम्ही 2021 मधील आमचे 9वे उत्पादन बाजारात आणले आहे आणि याहून अधिक आनंदी आम्ही असूच शकत नाही. ऑडी क्यू5 अगदी पूर्वीपासून आमच्या सर्वाधिक विक्रीच्या गाड्यांपैकी एक आहे. हे मॉडेलही अशीच कामगिरी करेल, याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. अतिरिक्त सुधारणांच्या माध्यमातून ऑडी क्यू5 मध्ये लग्झरी, स्पोर्टीनेस, आराम आणि दैनंदिन वापरासाठी योग्यता यांचा अचूक संयोग साधण्यात आला आहे."
इंजिन-
ऑडी क्यू 5 मध्ये 249 हॉर्सपॉवर ऊर्जा आणि 370 एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या 2.0 लिटर टीएफएसआय इंजिनच आहे. इंजिन ब्रेक एनर्जी रिकव्हरीसह 12-व्होल्ट सौम्य-हायब्रिड सिस्टमसह सुसज्ज आहे. ही एसयूव्ही 7-स्पीड एस-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ड्युअल-क्लच गिअरबॉक्स देण्यात आले आहेत.
खासियत-
ऑडी क्यू 5 2021 मध्ये 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलंय, जे एएमएम टच, व्हॉईस कंट्रोल अॅपल कारप्ले आणि अॅन्ड्राईड ऑटोला सपोर्ट करते. ही एसयूव्ही कार केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. एसयूव्ही कारमध्ये 19 इंचाचा अलॉय व्हिल मिळणार आहे. या कारमध्ये ऐबियन्ट लाईटिंग, पॅनोरमिक सनरुफ, वायरलेस फोन चार्जर, फ्रंट पार्किंग सेन्सर आणि बँग एण्ड ओल्फसेन म्युजिक सिस्टम देण्यात आलंय. हाय- स्पेक टेक्नोलॉजी ट्रीममध्ये 755 आऊटपूट आणि 3 डी साऊंड इफेक्टसह 19 स्पीकर साऊंड असेल. या कारची टॉप स्पीड 237 किमी प्रतितास आहे. 6.3 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते.