सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी? अन्यथा होऊ शकते फसवणूक
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे, त्यामुळं सोन्याची खरेदी तेजीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोन्याची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Gold Purchasing Tips News : सध्या दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही केल्या सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत नाही. 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 73 हजार रुपयांवर पोहोचला आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे, त्यामुळं सोन्याची खरेदी तेजीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोन्याची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
काल देशात सर्वत्र अक्षय्य तृतीयाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिवशी सोन्या चांदीची खरेदी शुभ मानली जाते. मोठ्या प्रमाणात लोकांन काल सोन्याची खरेदी केली आहे. दरम्यान, तुम्हालाही सोन्याची खरेदी करायची असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुमची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार आहे. जाणून घेऊयात सोन्याची खरेदी करताना नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची खरेदी करा
सर्वात महत्वाचे म्हणजे हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच तुम्ही खरेदी करा. BIS हॉलमार्क दागिने सोन्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करताना या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.
सोन्याचे वजन तपासने गरजेचं
सोने खरेदी करताना त्याचे वजन तपासने खूप गरजेचे असते. वजनामधील किंचित चढ-उतारही समस्या निर्माण करू शकते. सोने खरेदी तुम्हाला महागात पडू शकते
सोन्याची शुद्धता तपासून घेणं महत्वाचं
सोन्याची खरेदी करताना सोन्याची शुद्धता महत्वाची असते. सोन्याची शुद्धता तपासून घ्यावी. 24 कॅरेट सोनं म्हणजेच 999 अंकित सोने सर्वात शुद्ध असते. तुम्ही सोन्याचे दागिने सामान्यतः 18 ते 22 कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामध्ये इतर धातूही मिश्रित असतात. तर 24 कॅरेट सोन्याचे दागिने न बनवता सोन्याच्या नाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेटचे सोने वापरले जाते.
सोन्याची खरेदी केलेलं बिल सोबत घ्या
सोने खरेदी केल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ज्वेलर्सकडून बिल घेण्यास विसरु नका. बिलावर मेकिंग चार्ज आणि जीएसटी संबंधित सर्व आवश्यक माहिती दिलेली असल्याची खात्री करा. सोने खरेदी करताना निश्चित बिल सोबत ठेवा. बिल सोबत असल्यास तुमच्याकडे सोनं खरेदी केल्याचा पुरावा कायम राहतो.
दागिने तयार करण्याच्या चार्जेसबद्दल चर्चा करा
दागिने खरेदी करताना तुम्हाला जर एखादा जागिना तयार करायचा असेल तर तुम्ही त्या दागिण्यांच्या चार्जेसबद्दल चर्चा करा. सोन्याचे दागिने खरेदी करताना नेहमी मेकिंग चार्जेसवर बोला. कारण बहुतेक ज्वेलर्स वाटाघाटी केल्यांनतर मेकिंग चार्जेसची किंमत कमी करतात. लक्षात घ्या की दागिन्यांच्या एकूण किंमतीत फक्त मेकिंग चार्जेसचा हिस्सा 30 टक्के असतो. ज्यामुळं सोनारांना फायदा होतो. त्यामुळं सोनं खरेदी करण्यापूर्वी मेकिंग चार्जेसवर बोलणं महत्वाचं ठरतं.
महत्वाच्या बातम्या:
सोन्याच्या गुंतवणुकीतून मोठा परतावा, दिल्ली ते मुंबई काय आहेत सोन्याचे दर?