Amazon : अमेझॉनच्या विकसित भारत संकल्पनेसाठी दोन मोठ्या योजना, भारतातून जगभरात 80 अब्ज डॉलर्सची निर्यात करणार अन्...
Amazon : ई कॉमर्स कंपनी अमेझॉन भारतात आणखी एका व्यवसायामध्ये पाऊल टाकणार आहे. त्या सेवेची सुरुवात बंगळुरुमधून होणार आहे.
नवी दिल्ली : जगभरातील ई कॉमर्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेल्या अमेझॉननं दोन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक विकसित भारत संकल्पनेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अमेझॉन 2030 पर्यंत भारतातून 80 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात करणार आहे. याशिवाय कंपनी क्विक कॉमर्स क्षेत्रातील वाढत्या व्यवसायाला लक्षात घेऊन बंगळुरुत प्रायोगिक तत्त्वावर क्विक कॉमर्स सेवा सुरु करेल. याद्वारे कंपनी 15 मिनिटात ग्राहकांपर्यंत वस्तू आणि इतर साहित्य पोहोच करेल.
विकसित भारत संकल्पेनला चालना देण्यासाठी अमेझॉननं भारतातून 2030 पर्यंत 80 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंची निर्यात करण्याचं धोरण ठेवलं आहे. त्यानुसार 2025 पर्यंत 20 अब्ज डॉलर्सची निर्यात केली जाईल.
अमेझॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये भारतातून 12 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंची निर्यात केली आहे. 2025 मध्ये निर्यात 20 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचा अमेझॉनचा प्रयत्न असेल.
अमेझॉननं बंगळुरुत 15 मिनिटात वस्तू पोहोचवण्याची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करणार आहे. अमेझॉन इंडियाचे हेड समीर कुमार यांनी कंपनी बंगळुरुत या महिन्यात प्रायोगिक तत्वावर सेवा सुरु करणार असल्याची माहिती दिली. अमेझॉनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 42 हजार विक्रेत्यांकडून जवळपास 3 कोटी ऑर्डर दुसऱ्याच दिवशी म्हणजे एका दिवसातपूर्ण केल्याची माहिती दिली. मोठ्या शहरांमध्ये क्विक कॉमर्स बाबत चर्चा करतो मात्र देशातील इतर भागात देखील या बाबत विचार व्हायला हवा असं ते म्हणाले.
भारतातील लघू उद्योग, उत्पादक, स्टार्टअप आणि मेड इन इंडिया यातील उत्पादनांच्या निर्यातीसाठी अमेझॉन जागति विक्री योजनेद्वारे 80 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची विक्री येत्या 2030 पर्यंत करणार असल्याचं कुमार म्हणाले. यामध्ये घरगुती अन्न पदार्थांबाबत उत्पादनं, कपडे, खेळणी, आरोग्य आणि पोषणआहार, आयुर्वेद उत्पादनांचा समावेश आहे.
जगाती सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्यानं भारत अमेझॉनसाठी महत्त्वाचा बाजार आहे. छोट्या उद्योजकांना डिजिटल बनवणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्माण करणे या सरकारच्या उद्देशाप्रमाणं आमचा देखील उद्देश असल्याचं अमेझॉनचे अधिकारी म्हणाले.
अमेझॉन भारतात गेल्या 11 वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीनं पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 1 कोटी एमएसएमईला डिजीटल करण्यासाठी काम करणार आहे. देशातून 20 लाख अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा उद्देश पूर्ण करणे याशिवाय 20 लाख रोजगार निर्माण करण्याचा अमेझॉनचा प्रयत्न आहे.
इतर बातम्या :