एक्स्प्लोर

Gold Price: भारतात सोन्याचे दर वाढण्यामागं चीनचं कनेक्शन,सोनं गोळा करण्यामागं नेमकी रणनीती काय? 

Gold Price : चीनच्या केंद्रीय बँकेनं 6 महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. चीननं 2023 मध्ये जगात सर्वाधिक सोने खरेदी केली होती.  

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद चर्चेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या किमतींमुळं देखील चीन चर्चेत आहे. भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.  

99.9 टक्के शुद्ध असलेल्या सोन्याच्या दरात 820 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 79780 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 99.5 टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचा भाव 79380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. चांदीच्या दरात देखील 1 हजार रुपयांची वाढ झाली. प्रतिकिलो चांदीचा दर 94850 रुपयांवर पोहोचला आहे. 

सोने दरात वाढ होण्यामागं चीन कनेक्शन

चीनच्या केंद्रीय बँकेनं सहा महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा सोने खरेदी सुरु केली आहे. 2023 मध्ये चीननं जगात सर्वाधिक सोने खरेदी केली होती. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पीबीओसीच्या सोने खरेदीमुळं चीनमध्ये सोन्याची मागणी वाढेल, त्याचा परिणाम जागतिक बाजारावर पडेल. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हे पाऊल अमेरिकेकडून चीनवर लावल्या जाणाऱ्या संभाव्य टॅरिफमुळं टाकण्यात आलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात टॅरिफच्या भरपाईसाठी चीन सोने वापरु शकतं.  

MCX काय किंमत होती?

स्थानिक बाजार जानकारांच्या माहितीनुसार जागतिक बाजारातील तेजी आणि चीनच्या सोने खरेदीनं किंमती वाढल्या आहेत. एमसीएक्सवर फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोनेच्या दरात 279 रुपयांची म्हणजेच 0.36 टक्के वाढ होऊन प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 77765 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीचा दर प्रतिकिलो 95068 रुपयांवर होता.   

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात देखील तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्स गोल्ड वायदा 15.20 डॉलरने वाढून 2701 डॉलर प्रति औस पर्यंत पोहोचला. चांदीच्या दरात मात्र घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर 32.55 डॉलर प्रति औस वर आला.  

सोने दरात वाढ होण्याचं कारण?

दरम्यान, फेडरल रिझर्व्ह द्वारे व्याज दरात संभाव्य कपात लक्षात घेता आणि  चीनच्या सक्रियतेनं सर्राफा बाजारात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेचा अकृषिक उत्पादकता डाटा आल्यानंतर बाजारात बदल होऊ शकतात.तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोने आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. भारतात सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं देखील सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या : 

Mehul Choksi : मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यास कोर्टाची परवानगी

WhatsApp : व्हॉट्सॲपकडून लघु व्‍यवसायांना प्रशिक्षित करण्‍यासाठी मोठे पाऊल; भारत यात्रा उपक्रमाचा शुभारंभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान म्हणाले...
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान अल्बनीज म्हणाले...
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
Nashik Crime: 'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Protest: 'डॉक्टर महिलेला न्याय द्या', Congress आक्रमक, अनेक नेते ताब्यात
Congress Protest : 'इथे गुन्हेगारांना सूट आहे', युवक काँग्रेस आक्रमक, मुंबईत आंदोलन
Congress Protest : मुंबईत युथ काँग्रेस आक्रमक, शिवराज मोरेंसह अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Congress Protest : फलटण डॉक्टर प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
Congress Protest : फलटण डॉक्टर प्रकरणी काँग्रेस आक्रमक, 'वर्षा'वर मोर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान म्हणाले...
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान अल्बनीज म्हणाले...
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
Nashik Crime: 'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार, आवर घालण्याची गरज; अनिकेत तटकरेंची जहरी टीका महायुतीत भडका
महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार, आवर घालण्याची गरज; अनिकेत तटकरेंची जहरी टीका महायुतीत भडका
Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
Embed widget