पेट्रोल, डिझेल पाठोपाठ आता दैनंदिन वस्तू या तिमाहीत महाग होणार
पेट्रोल, डिझेलसह दैनंदिन वापरांतील विविध वस्तू महाग होऊ शकतात कारण कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि मार्जिनवरील दबाव लक्षात घेऊन कंपन्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता बिस्किटांपासून ते सौंदर्य उत्पादनांच्या किमती वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि मार्जिनवरील दबाव लक्षात घेऊन कंपन्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. इंग्लिश बिझनेस न्यूज वेबसाइट मिंटने ही बातमी दिली आहे. 'आम्ही काही काळापासून किंमती वाढवलेल्या नाहीत. सणासुदीच्या काळात कंपन्यांनी किंमती वाढवल्या नाहीत. त्यात या तिमाहीत पाच टक्के वाढ होऊ शकते. कारण कमोडिटीच्या किमती वाढणार हे यामागील कारण आहे.' असं कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष एरिक ब्रागांझा यांनी सांगितलं
काही कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्यामुळे ही वाढ सारखी होणार नाही, असंही ते म्हणाले. पंखे, कुलर आणि स्वयंपाकघरातील उपकरणे बनवणाऱ्या ओरिएंट इलेक्ट्रिक कंपनीने सांगितले की, 'गेल्या 18 महिन्यांत वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. प्लॅस्टिक, स्टील आणि तांब्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे ओरिएंट उत्पादनांच्या किमती 4-7 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.'
बिस्कीटंही महागणार
याशिवाय देशातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी ब्रिटानिया देखील आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनी किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ करु शकते. गहू, साखर, पाम तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने किमती एक टक्क्यापर्यंत वाढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत 4 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 8 टक्के वाढ झाली.
2021 च्या सुरुवातीपासून किमतींमध्ये वाढीचा कल आहे. याचे कारण म्हणजे कोरोना महामारीनंतर जगभरातील आर्थिक घडामोडी पुन्हा रुळावर येत आहेत. डिसेंबरमध्ये भारतात घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा दर वाढला आहे. डाबरने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यात हनीटस, पुदिन हरा आणि च्यवनप्राशच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा :
- आता कर्ज घेणं महागणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो दर वाढवण्याच्या विचारात
- इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी
- किती महागले गहू, तांदूळ? गेल्या पाच वर्षातील दरवाढीची केंद्राने दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha