इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी
offline e-payment : रिझर्व्ह बँकेने ऑफलाइन डिजिटल पेमेंट करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
Offline Digital Transaction: भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑफलाइन डिजीटल पेमेंट्सबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता गावांमध्ये आणि दुर्गम भागांत डिजिटल व्यवहार ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. ऑफलाइन पेमेंटनुसार सध्या 200 रुपयांच्या व्यवहाराला मंजुरी देण्यात आली आहे.
डिजिटल इंडियाकडे पाऊल
आरबीआयने म्हटले की, 200 रुपयांचे कमाल 10 व्यवहार म्हणजे 2000 रुपयांपर्यंतचे ऑफलाइन डिजिटल व्यवहार करता येणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन मिळणार असून डिजिटल इंडियाच्या दिशेने पुढे जाण्यास मदत मिळणार आहे.
RBI releases Framework for Facilitating Small Value Digital Payments in Offline Modehttps://t.co/GfEeWXkBoZ
— ReserveBankOfIndia (@RBI) January 3, 2022
प्रायोगिक तत्वावर झाली होता प्रयोग
देशातील काही भागांमध्ये ऑफलाइन पेमेंट प्रायोगिक तत्वावर करण्यात आला होता. त्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाइन पेमेंटची आवश्यकता खेडेगावात अधिक आहे.
रिझर्व्ह बँकेने काय म्हटले?
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, ऑफलाइन पेमेंटमुळे कमकुवत इंटरनेट कनेक्टिविटी असलेल्या गावांना फायदा होणार आहे. यामुळे डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन मिळणार आहे.
असे होणार डिजिटल पेमेंट
ऑफलाइन पेमेंटचा वापर ग्राहकाच्या मंजुरीनंतर करण्यात येऊ शकतो. या प्रकारच्या व्यवहाराला 'अॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन'ची आवश्यकता राहणार नाही. ऑफलाइन पेमेंट असल्यामुळे ग्राहकांना एसएमएस अथवा ई-मेल द्नारे मिळणारा मेसेज काही वेळेनंतर मिळणार.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- OTP नाही, लिंकवर क्लिक नाही तरी बँक खात्यावर हॅकर्सचा दरोडा; पोलिसही चक्रावले
- खचलेली अर्थव्यवस्था, महागाईचा विक्रमी उच्चांक; भारताचा 'हा' शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
- ओमायक्रॉनची लाट म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड; शास्त्रज्ञांचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha