Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी शेवटचे 12 दिवस, अधिकृत नोंदणी केंद्र कसं शोधायचं? जाणून घ्या
Aadhaar Update Centre : मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शेवटचे 12 दिवस शिल्लक आहेत. अधिकृत आधार नोंदणी केंद्र कसं शोधायचं या बाबत आपण माहिती घेणार आहोत.
![Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी शेवटचे 12 दिवस, अधिकृत नोंदणी केंद्र कसं शोधायचं? जाणून घ्या Aadhaar Card Update is Mandatory whose card is old than 10 years check here how to locate your nearest Aadhaar Enrollment Centre Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी शेवटचे 12 दिवस, अधिकृत नोंदणी केंद्र कसं शोधायचं? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/02/8520e4883ce8835c94d3a4d996ec33b01725283671759989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांना अनेक कारणांसाठी त्यामधील माहिती दुरुस्ती करायची असते. अनेकदा काही जणांचा पत्ता बदलेला असतो. काही जणांच्या नावात बदल झालेला असतो. तर, अनेकांची जन्मतारीख नोंदवायची राहून गेलेली असते. यासाठी आधार कार्ड नोंदणी केंद्रामध्ये (Aadhaar Enrollment Center) जाण्याची गरज असते. याशिवाय यूआयडीएआयनं ज्यांचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं झालेलं आहे त्यांना ते अपडेट करुन घेणं बंधनकारक केलं आहे. आधार कार्डमधील बायोमेट्रिक डिटेल्स मोफत अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागतं. हे आधार नोंदणी केंद्र कसं शोधायचं हे आज जाणून घेणार आहेत.
आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला प्रथम यासाठी यूनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी राज्य, पोस्टल पिनकोड आणि सर्च बॉक्स या तीन पर्यायांचा वापर करता येईल.
राज्य हा पर्याय निवडल्यास तुम्हाला प्रथम राज्य निवडावे लागेल. इथं आधार कार्ड धारक महाराष्ट्रातील असल्यास तुम्हाला महाराष्ट्र निवडावे लागेल. त्यानंतर जिल्हा, उपविभाग किंवा तालुका, गाव, शहर नोंदवा, यानंतर कायम स्वरुपी नोंदणी केंद्र दाखवा या चेक बॉक्सवर क्लिक करावं लागेल, यानंतर कॅप्चा कोड नोंदवून तुम्ही तुमच्या जवळचं आधार नोंदणी केंद्र कोणतं आहे ते पाहू शकता.
पोस्टल पिनकोड पर्यायाचा वापर केल्यास तुम्हाला तुम्ही राहता त्या ठिकाणाचा सहा अंकी पिनकोड आधार च्या वेबसाईटवर नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा क्रमांक नोंदवून आधार नोंदणी केंद्र शोधता येईल.
सर्च बॉक्स हा पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव नोंदवाव लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवून तुम्ही आधार नोंदणी केंद्र शोधता येईल.
आधार कार्ड काढून 10 वर्ष झाली असल्यास त्यातील माहिती आणि बायोमेट्रिक नोंदी अपडेट करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. यूआयडीएआयनं यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळं तुम्हाला जर आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाली असतील तर ते अपडेट करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही वर दिलेल्या आधार नोंदणी केंद्र कसं शोधायचं याबाबतच्या माहितीचा उपयोग करुन घेऊ शकता.
दरम्यान, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिकृत केंद्रावर भेट देऊनचं आधार कार्डमधील माहिती अपडेट करावी.
इतर बातम्या :
भारताच्या उद्योग विश्वात मोठी घडामोड! टाटा उद्योग समुहाच्या तीन कंपन्यांचे विलीनीकरण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)