Ladki Bahin Yojana: खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा मारतील, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले न्यायालय बहिणींना न्याय देईल
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं.
CM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं. काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे झाले आहेत. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालय देखील आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडक्या बहिणी खोडा घालणाऱ्यांना जोडा मारल्याशिवाय राहणार नाहीत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी काही लोक कोर्टात गेले आहेत. त्यांचा इतिहास बघा. कुणाचे आहेत हे लोक. मी तेव्हाही म्हणालो होतो कोर्ट आमच्या बहिणीवर अन्याय करणार नाही. बहिणींना न्याय देईल. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता जोडे मारेल
आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारच्या विरोधात जोडे मारो आंजोलन करण्यात आलं. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घटना दुर्दैवी आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही तिघांनी माफी मागितली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहेच. पण, त्याच राजकारण करणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कर्नाटक काँग्रेस सरकरकारच्या काळात मागील वर्षी जी दुर्घटना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी दोन दोन जेसीबीचा वापर केला. खरंतर त्यांना जोडे मारले पाहिजेत. जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता नक्की जोडी मारेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महायुतीचं सरकार कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधक दंगलीची भाषा करत होते. महाराष्ट्र अशांत करण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभेपूर्वी केला आहे. मात्र देशातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महायुती सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लाकडी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात 1 कोटी 8 लाख पात्र महिलांच्या खात्यावर प्रत्येकी तान हजार रुपये पाठवले होते. आता काल ( 31 ऑगस्टला) दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले आहेत.
महत्वाच्या बातम्या: