8th Pay Commission Salary: आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणं पगार वाढणार का?तज्ज्ञांनी नेमका काय अंदाज वर्तवला
8th Pay Commission Salary Hike: सरकारनं अलीकडच्या काळात परिपत्रक जारी करुन आठव्या वेतन आयोगासाठी 40 पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे.

8th Pay Commission Salary Hike नवी दिल्ली: केंद्र सरकारनं जानेवारी 2024 मध्ये 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांची यांची एकूण संख्या 1.2 कोटी इतकी आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शधारकांमध्ये आठव्या वेतन आयोगाची रुपरेषा आणि संभाव्य पगारवाढीसंदर्भात चर्चा सुरु आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि पगार किती वाढेल याबाबत चर्चा सुरु आहेत.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर हा गुणांक असतो ज्याच्या आधारे नव्या वेतन आयोगात नव्या वेतन आयोगात नव्या मूळ वेतनाची गणना केली जाते. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 18000 आहे आणि फिटमेंट फॅक्टर 2.86 असतो. त्यानुसार मूळ वेतन 51480 रुपये होते. मात्र, ही रक्कम मोठी दिसत असली तरी तितका लाभ होत नाही.
गेल्या वेतन आयोगात काय घडलं?
सहाव्या वेतन आयोगात (2006) फिटमेंट फॅक्टर 1.86 होता. ज्यामुळं 54 टक्के पगार वाढ झाली आहे.सातव्या वेतन आयोगात (2016) फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के होता. मात्र, पगारवाढ केवळ 14.2 टक्के होती. यामुळं , मुख्य कारण हे होतं की फिटमेंट केवळ महागाई भत्ता समायोजित करण्यासाठी वापर करण्यात आला होता.
यावेळी काय होऊ शकतं?
वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांची मागणी आहे की 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 असावा, ज्यामुळं वेतनात आणि पेन्शनमध्ये खऱ्या अर्थानं वाढ होऊ शकते. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार माजी वित्त सचिव सुभाष गर्क यांच्या मते इतकी मोठी वाढ शक्य वाटत नाही. फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित केला जाऊ शकतो. असं झालं तर किमान मूळ वेतन 34560 होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टरचा बराचसा भाग महागाई समायोजनात जाऊ शकतो.
7 व्या वेतन आयोगात किती पगार वाढला?
सातव्या वेतन आयोगात पगारासह 125 टक्के महागाई भत्ता जोडण्यात आला होता. त्यास्थितीत 2.57 फिटमेंट फॅक्टरमध्ये 0.32 नवी वाढ मानली गेली होती. म्हणजेच एकूण वाढीपैकी केवळ 14.2 टक्के खरा फायदा होता. बाकी पहिल्यापासून मिळणाऱ्या रकमेचं नवं रुप होतं.
सध्या स्थिती काय?
सरकारनं अलीकडे दोन परिपत्रकं जारी करत 8 व्या वेतन आयोगात 40 पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली होती. यानुसार विविध विभागातून प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. लवकरच आयोगाच्या टर्म ऑफ रेफ्ररन्स जारी केल्या जातील. ज्यानंतर चेअरमन आणि इतर सदस्य नियुक्त होतील. 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्या जातणार आहेत. 7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे.
सातव्या वेतन आयोगावेळी सरकारवर 1.02 लाख कोटी अतिरिक्त आर्थिक बोजा पडला होता. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर जितका अधिक असेल त्यानुसार बोजा वाढू शकतो. सरकार यावेळी विचार करुन पावलं उचलत आहे.























