Rs 2000 Note : 2000 रुपयांच्या नोटा कायमस्वरूपी बंद की तात्पुरता निर्णय? जाणून घ्या सविस्तर माहिती
Rs 2000 Note : आरबीआयच्या घोषणेनुसार, 30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांची नोट चलनात वापरता येणार नाही.
Rs 2000 Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात येणार असल्याची धक्कादायक घोषणा केली. याबरोबरच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये जाऊ शकतात. 23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 2000 रुपयांच्या नोटांसंबंधी सर्व माहिती जाणून घ्या.
2016 च्या नोट बंदीनंतर 2000 ची नोट चलनात आली
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर, त्याच वर्षी RBI कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.
2000 च्या नोटेचा उद्देश पूर्ण झाला - आरबीआय
आरबीआयने जारी केलेल्या निर्णयानुसार, 2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. इतर मूल्यांच्या नोटा बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
2000 च्या नोटा कायमस्वरूपी बंद?
आरबीआयच्या प्रेस रिलीझमध्ये असेही म्हटले आहे की, सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आरबीआयकडून 2000 रुपयांची नोट बंद न करता ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने या निर्णयाला 'क्लीन नोट पॉलिसी' असे म्हटले आहे.
सध्या चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदाच राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या बँकांना खात्यात नोट जमा करण्याची आणि 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे.
2000 ची नोट 30 सप्टेंबरपर्यंत वैध मानली जाईल
जर एखाद्याला दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घ्यायच्या असतील तर 2000 रुपयांच्या नोटा एका वेळी 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलल्या जाऊ शकतात. तसेच, कोणत्याही बँकेत नोटा बदलून घेता येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :