(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rs. 2000 note: आरबीआयकडून 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय; तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर...
Rs 2000 Note: आरबीआयने आज दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले असतील. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...
Rs 2000 Note: 2000 रुपयांची नोट (Rs 2000 notes) चलनातून रद्द करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतला आहे. मात्र, 2000 रुपयांच्या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. आरबीआयच्या आजच्या निर्णयानंतर अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले असतील. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...
2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.
सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या "क्लीन नोट पॉलिसी" च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.