एक्स्प्लोर

Blog: जागतिक साडी दिवस!

World Saree Day 2022: सध्याची पिढी पाहिली तर पारंपरिक पेहरावापेक्षा वेस्टर्न पेहराव त्यांना जास्त जवळचा आणि आरामदायक वाटणारा आहे. माझं असं मत आहे की, वेस्टर्नचा कितीही प्रभाव पेहरावावर असला तरी कपाटाचा आणि मनाचा एक खास कोपरा हा साडीसाठी असतोच.

बाई जाड असो वा बारीक, ठेंगणी असो किंवा उंच , तिचा रंग कोणताही असो पण प्रत्येकीला साजेसा पेहराव म्हणजे साडी. मला कॅरी करायला जमतचं नाही असा दावा करण्याआधी त्यातली सुंदरता सहजता उमजून तिच्याशी मैत्री केली की ती आपलीशी वाटते मग ती सांभाळणं देखील सहज होतं.

साड्या नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, अगणित रंगसंगती आहेत आणि काही रुपयांपासून ते लाखोंच्या किंमती आहेत, असं सगळं गणित असलं तरी साडीसारखं वस्र नाही. ही साडी भारतातल्या वेगवेगळ्या संस्कृतींचं आणि त्यामधल्या कलाकुसरींचं दर्शन घडवते. 150 पेक्षा अधिक प्रकारच्या साड्या आहेत. भारतात प्रत्येक राज्याची ओळख देखील त्या त्या राज्यातल्या साडीमुळे होते. जसं महाराष्ट्राची पैठणी, गुजरातची बांधणी, बंगालची जामदानी, मध्य प्रदेशची महेश्वरी वगैरे वगैरे. या व्यतिरिक्त कांजीवरम, कलकत्ता, इरकल, कोईमतूरी, पटोला, खादी, गडवाल, इंदूरी, आॅरगंडी, आंरगेंझा, इक्कत, ओरीसी, कश्मिरी काय काय मनमोहक प्रकार सांगावेत.

खरंतर साडी हा  पोशाक कधीही नेसता येणारा आहे म्हणजे लग्न समारंभ, गेट टू गेदर किंवा कॉर्पोरेट मिटींग, साडीच्या विविध रुपानुसार आपण ती नेसू शकतो. पण सध्या कसं आहे शॉर्ट पॅन्ट घालून गेलं तर कोणाचं लक्ष जाणार नाही पण सणवार सोडून नेसलीच साडी तर अनेकांच्या भुवया उंचावतात आणि प्रश्न-उत्तरं सुरु होतात. साडी हा माझ्या अगदी जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय. ती पाहयला नेसायला फारच आवडत असल्याने नेहमीच वेगवेगळे प्रकारांच्या साड्यांच्या शोधात राहणं, प्रत्येकवेळी खरेदी करता आली नाही तरी ती पाहणं, त्यामागची कलाकुसर समजून घेणं हा सगळ्यात आवडता छंद. साडीमागे करावी लागणारी मेहनत त्या मागची थॉटप्रोसेस समजून घेणं म्हणजे माझ्यासाठी खूपचं आवडीचं आणि आनंद देणारं काम. या साड्यांच्या जवळ गेल्यानंतर हातमागावर काम  करणाऱ्या  कामगारांच्या व्यथा, त्यांची मेहनत आणि हातमागावर तयार झालेली साडीची सुंदरता समजली. 

Blog: जागतिक साडी दिवस!

साड्या खरेदी दरम्यान हातमागावरच्या किंवा ज्याला आपण प्युअर फॉर्म ऑफ मेटेरिअल किंवा प्रिंट (Pure form of Material or Print) म्हणतो त्याबद्दल असलेलं अज्ञान अजून ही खूप आहे. उदाहरण सांगायचे तर मराठमोळी पैठणी साडी. ही सिल्कची पैठणी खरेदी करायची तर आज घडीला किमान 8 हजारांपासून सुरुवात आहे. मात्र पॉवरलूमच्या बाजारात ही पैठणी चक्क 700- 800 पासून सुद्धा विकली जाते. अर्थातच हे म्हणजे सोन्याच्या आणि बेन्टेक्सच्या दागिन्यांमध्ये तुलना करणं आहे. माझं अजिबात म्हणणं नाही की प्रत्येकवेळी या हातमागावरच्या प्युअर साड्या विकत घ्या. पण आपल्या साड्यांच्या खजिन्यात किमान वर्षांला अशा एका हातमागावरच्या साडीची भर घातली तर हातमाग कारागिरांची लोप पावत चाललेली कला आपल्याला जपता येईल. आजच्या जागतिक साडी दिनानिमित्ताने महिन्यातून किमान एकदा तरी साडी नेसण्याचा संकल्प करुयात. साडी अजिबात ऑल्ड फॅशन नाही. काहीजणींच मत असतं, साडी मला आवडते पण साडीत फारच ऑल्ड फॅशन वाटतं , साडी नेसून आपण सेक्सी नाही दिसू शकतं. पण खरतर आपल्याला आवडतं ते घेतलं तर आपलं सौंदर्य आणखीनच खुलेल, नाही का? हजारो वर्षांपासून या साडीची अनेक रुपं बदलतं राहिली पण तरीही आज साडी उंची वस्र म्हणून ओळखलं जातं.
लज्जा झाकणारे पण स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचे अतिशय मादक दर्शन घडवू शकणारे असे हेच वस्त्र!

Blog: जागतिक साडी दिवस!

 (सौजन्यः chakori enthnic Instagram)

BLOG | सायकल आणि बरचं काही...

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget